शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नलफडीची जि.प. शाळा झाली ‘ज्ञानगंगा एक्स्प्रेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

इतर शाळेप्रमाणे आपली शाळाही सुंदर दिसावी, या उद्दात हेतूने येथील शिक्षक रामरतन चाफले यांच्या पुढाकारातून त्यांनी स्वखर्चातून एका वर्गखोलीची रंगरंगोटी केली. त्यानंतर शाळेची मुख्य समस्या विचारात घेऊन गावातील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सभा घेऊन शाळेतील समस्या मार्गी लावण्याचे ठरले.

ठळक मुद्देसुविचारांनी बोलू लागल्या भिंती : लोकसहभागातून केला शाळेचा कायापालट

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मनात जिद्द आणि प्रचंड आत्मविश्वास असेल तर कोणतेच काम अडचणीचे ठरत नाही. त्यात चांगले काम करण्यासाठी लोकसहभाग असला तर ते काम अधिकच सुखकर होते. राजुरा तालुक्यातील नलफडी येथील जि.प. उच्च. प्राथ.शाळेची अतिशय देखणी रंगरंगोटी आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला असून या शाळेच्या बोलक्या भिंतींमुळे ही शाळा आता ‘ज्ञानगंगा एक्स्प्रेस’ झाली आहे.नलफडी येथील जि.प.उच्च.प्राथ.शाळेत १ ते७ वर्ग आहेत. राजुरा तालुका स्थळापासून अतिशय दुर्गम भागात असलेले तसे हे दुर्लक्षित गाव. मात्र आपली मुले शिकून मोठी झाली पाहिजे, असे येथील शिक्षक आणि गावकऱ्यांना मनोमय वाटत होते. त्यासाठी शिक्षणासोबतच शाळेची इमारत व शैक्षणिक वातावरण तेवढेच चांगले असावे लागते.इतर शाळेप्रमाणे आपली शाळाही सुंदर दिसावी, या उद्दात हेतूने येथील शिक्षक रामरतन चाफले यांच्या पुढाकारातून त्यांनी स्वखर्चातून एका वर्गखोलीची रंगरंगोटी केली. त्यानंतर शाळेची मुख्य समस्या विचारात घेऊन गावातील ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची सभा घेऊन शाळेतील समस्या मार्गी लावण्याचे ठरले.त्यानंतर शाळेच्या इमारतीला लोकसहभागातून रंगरंगोटी करण्यात आली. यासाठी संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश रामावत यांची मोलाची मदत लाभली. शाळेच्या संरक्षण भिंतीवर रेल्वेचे डब्बे साकारत अतिशय देखणी रंगरंगोटी व सुविचार लिहून शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. येथील मुख्याध्यापक सुरेश उमरे, शिक्षक रामरतन चाफले, राकेश नंदूरकर, जयबुध्द राऊत, सरपंच अर्चना धानोरकर, उपसरपंच विनोद धोटे, शा.व्य.स.अध्यक्ष मंगला टेकाम, शौकत शेख, भास्कर धोटे, दिलीप टेकाम, मनोहर चांदेकर, विलास निंदेकर यांच्या व गावकऱ्यांच्या लोकसहभागातून नलफडी येथील जि.प.उच्च.प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे. यामुळे दुर्गम भागातील ही शाळा आता आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे.पाण्याची समस्या निकाली काढलीनलफडी येथील शाळेच्या आवारात नेहमी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने शाळेला तलावाचे स्वरूप यायचे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र गावकºयांच्या लोकसहभागातून जवळपास दीड लाख लोकवर्गणी गोळा करून शाळेच्या आवारात १२० ट्रॅक्टर माती व मुरूम टाकून पाण्याची समस्या निकाली काढली.शिक्षण विभागातील अधिकारी, शाळेचे सर्व शिक्षक व गावकºयांच्या लोकसहभागातून नलफडी येथील जि.प. उच्च.प्राथ. शाळेचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. येथील शाळेच्या सर्व भिंतीवर रंगरंगोटी करून भिंतीवर विविध सुविचार लिहून भिंती बोलक्या करण्यात आल्या.- सुरेश उमरे, मुख्याध्यापक, जि.प. उच्च.प्राथ.शाळा, नलफडी.

टॅग्स :Schoolशाळा