शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यात विमाशि कटिबद्ध

By admin | Updated: November 13, 2015 01:09 IST

महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी ....

सुधाकर अडबाले : गडचांदूर येथे सत्कारगडचांदूर : महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात विविध ज्वलंत समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेच्या मागे राहण्याचे आवाहन विमाशीचे नवनिर्वाचीत सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित सत्कार समारंभात केले.कोरपना- जिवती तालुका विमाशीच्या वतीने सोमवारी सुधाकर अडबाले यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे होते, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल थिपे, प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, धनंजय गोरे, विमाशीचे जिल्हा कार्यवाह शेंडे, ठाकरे, कोडलकर, नभिलास भगत, बावणे, धोपटे सोनकुसरे, तुळशिराम पुंजेकर, गोखरे, पर्यवेक्षक गिरीधर बोबडे, उद्धव निखाडे, मुख्याध्यापक अशोक डोहे तथा इतर पाहुणे उपस्थित होते.नवनिर्वाचीत सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांचा सत्कार डॉ. अनिल चिताडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन करण्यात आला. सुधाकर अडबाले यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षण क्षेत्रातील सुरु असलेला सवळागोंधळ सांगितला. दररोज नवनवीन अध्यादेश काढून शिक्षकांना वेठीस धरण्याचे कार्य शासन करीत असल्याचा आरोप करुन या विरोधात शिक्षकांना न्याय देण्यासाठी विमाशी कटीबद्ध असल्याचे सांगितले. विमाशीने अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याचे सांगून विमाशीला मजबूत करण्यासाठी पूर्व वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.डॉ. अनिल चिताडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थी केंद्रीत शिक्षण धोरण शासनाने तयार करावे. शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, असे सांगितले. यावेळी विठ्ठल थिपे यांनी विमाशीच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोडलवार यांनी केले. संचालन विमाशीचे जिवती तालुका अध्यक्ष पाचभाई यांनी केले. आभार कृष्णा बत्तुलवार यांना मानले. कार्यक्रमाला कोरपना जिवती तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक, प्राध्यापक उपस्थित होते. (वार्ताहर)