नेहमीप्रमाणे सकाळी उठून त्याने नाश्ता केला पण खोलीत जाऊन.. कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या आमहत्येचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:13 IST2025-11-21T20:12:01+5:302025-11-21T20:13:53+5:30
Chandrapur : एका विद्यार्थ्याने रामनगर येथील वसतिगृहात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

He woke up in the morning as usual and had breakfast, but when he went to his room... what was the reason for the suicide of a boy studying in a coaching class?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूरः एका विद्यार्थ्याने रामनगर येथील वसतिगृहात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सव्वा ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव प्रथमेश गुलाब चुधरी (१७), रा. धानोरा (पिपरी) आहे.
"माझ्या मुलाला तो राहत असलेल्या हॉस्टेलचे वार्ड बॉय आणि व्यवस्थापनामधील कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत होते. त्याची मनस्थिती बरोबर वाटत नव्हती, परंतु त्याला आम्ही समजावून सांगितलं की, तू व्यवस्थित राहा. त्यानंतर आम्ही त्याच्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही" त्याने वार्डनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या वडिल गुलाब चुधरी यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी सायंकाळी वार्डन लक्ष्मण रमाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटिंग, सल्लागार विष्णूदास शरद ठाकरे आणि प्राचार्य आशिष कृष्णा कलम १०७, ३(५) अंतर्गत गुन्हा महातळे यांच्याविरुद्ध बीएनएस दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रथमेश जनता करिअर लॉन्चरच्या विज्ञान शाखेचा ११ वीचा विद्यार्थी होता तो महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहात होता. नेहमीप्रमाणे सकाळी उठून त्याने नाश्ता केला. त्यानंतर तो राहात असलेल्या खोलीत गेला. काही वेळाने पंख्याला लटकलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळले. रामनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.