शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

वडिलासमोरच मुलगी विहिरीत पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST

अडेगाव देश येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये यांचे पत्नीसोबत संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल सात महिन्यांची चिमुकली रुहानीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. मात्र तंटामुक्त समितीचे कुणी मिळाले नाही. याच दरम्यान पती मुलीला घेऊन भास्कर बदके यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे एका नागरिकाने सांगितले.

ठळक मुद्देमुलीचा मृत्यू : मुलगी पडताच वडिलाचीही उडी

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव (देश) येथील संघपाल केवड गजभिये याचे शुक्रवारी सकाळी पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. झालेल्या भांडणात संघपाल सात महिन्यांची मुलगी रूहानीला घेऊन गावाशेजारच्या शेतावर गेला. तहान लागली म्हणून विहिरीतून पाणी काढत असताना चिमुकली विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी वडीलानेही उडी घेतली. यामध्ये मुलीचा दुर्दैवी अंत झाला. मात्र पिता बचावला. सदर घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली.अडेगाव देश येथील रहिवासी असलेले संघपाल गजभिये यांचे पत्नीसोबत संशयावरून नेहमी वाद व्हायचे. शुक्रवारी सकाळीसुद्धा या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यात संघपाल सात महिन्यांची चिमुकली रुहानीला घेऊन निघून गेला. पत्नीही गावातील तंटामुक्त समितीकडे गेली. मात्र तंटामुक्त समितीचे कुणी मिळाले नाही. याच दरम्यान पती मुलीला घेऊन भास्कर बदके यांच्या शेतातील विहिरीत पडल्याचे एका नागरिकाने सांगितले. याची माहिती होताच गावकऱ्यांनीही विहिरीकडे धाव घेतली. मात्र चिमुकल्या रूहानीला वाचविता आले नाही. घटनेची माहिती चिमूर पोलीस विभागाला होताच घटनास्थळी पोहचून पोलिसांनी पंचनामा केला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला. रूहानीची आई सरिता हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून संघपाल गजभिये याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, संशय घेऊन संघपाल नेहमीच मारझोड व भांडण करायचा. त्यामुळे त्यानेच मुलीचा बळी घेतला असल्याचा आरोप पत्नी सारिताच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. पुढील तपास ठाणेदार स्वप्नील धुळे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू