पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन; चंद्रपूर एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 15:18 IST2026-04-13T15:16:15+5:302026-04-13T15:18:11+5:30

Chandrapur : राजुरा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे.

Five tribal farmers consumed poison; Shocking incident at Chandrapur SDO office | पाच आदिवासी शेतकऱ्यांनी केलं विष प्राशन; चंद्रपूर एसडीओ कार्यालयातील धक्कादायक घटना

Five tribal farmers consumed poison; SDO office takes extreme action

चंद्रपूर : राजुरा येथील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयात पाच आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या पाच शेतकऱ्यांपैकी दोघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. उर्वरित तिघांवर राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, माणिकगड सिमेंट कंपनीसाठी गेलेल्या शेतीचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याने संबंधित शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात अधिकृत कारणांची पडताळणी अद्याप सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात अधिकृत माहिती आणि चौकशी अहवालानंतरच संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title : चंद्रपुर एसडीओ कार्यालय में पांच किसानों ने जहर खाया; घटना से सनसनी

Web Summary : राजुरा एसडीओ कार्यालय में पांच आदिवासी किसानों ने सीमेंट कंपनी से मुआवजे का भुगतान न होने पर जहर खा लिया। दो की हालत गंभीर है, उन्हें चंद्रपुर ले जाया गया, जबकि तीन राजुरा में अस्पताल में हैं। जांच जारी है।

Web Title : Five farmers consume poison at Chandrapur SDO office; incident shocks

Web Summary : Five tribal farmers consumed poison at the Rajura SDO office due to unpaid compensation from a cement company. Two are in critical condition and were moved to Chandrapur for treatment, while three others are hospitalized in Rajura. An investigation is underway.