शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला भीषण आग, दोन गार्इंसह बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकºयाने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आग गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली.

ठळक मुद्देपाचगाव येथील घटना : आगीच्या धुपाटण्याने केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील पाचगाव येथील (मडावी गुडा) येथे शेतकरी गोविंदा मडावी यांच्या गोठ्याला सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याने दोन गायींसह एक बैल व काही कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत शेतीची अवजारे खत, औषधी जळून खाक ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे. या घटनेत सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.पाचगाव येथील गोविंदा मडावी यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. पावसाच्या दिवसात गोठ्या सभोवताल किडे व डासांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकऱ्याने आगीचे धुपाटणे केले होते. तेवढ्यातच पाऊस सुरू झाल्याने मडावी यांनी लगबगीने जनावरे गोठ्यात बांधून घराकडे गेले. जेवण करून सर्व गावकरी झोपेत असतानाच गोठ्याला अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून आग गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. उपसरपंच गोपाल जंबुलवार यांनी राजुरा येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन गायींसह एका बैल व काही कोंबड्या होरपळून ठार झाल्या. एक बैल आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाला. गोठ्यातील कृषी अवजारे, खताच्या २० बॅग जळाल्या. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाने आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तलाठी बापूजी गेडाम यांनी पंचनामा केला. शासनाने शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी पोलीस पाटील शंकर खामनकर उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, रामा आळे, तिरूपती इंदूरवार आदींनी केली आहे.गावकऱ्यांकडून मदतीचा हातऐन शेतीच्या हंगामात गोविंदा मडावी यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती पैसा नसल्याने हंगाम कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, गावकऱ्यांनी दोन तासात १३ हजार ९१३ रूपयांची आर्थिक मदत केली. कृषी केंद्र संचालकांनी औषधी, खत व सरकारी धान्य दुकानदारांनी धान्य देवून माणुसकीचे दर्शन घडविले.

टॅग्स :fireआग