शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मेहनतीला मोल नाही

By admin | Updated: November 13, 2015 01:14 IST

प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत.

गेवरा: प्रत्यक्ष राबणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या राज्यवस्थेनेच अकुशल व अडाणी ठरविले आहे. त्यांच्या मेहनतीचे मोल इतकी कमी केले की, त्यात ते धड पोटही भरु शकत नाहीत. मग इतर गरजा भागविणे तर दूरच. त्यांचा कच्चा माल मातीमाल विकावा लागतो. तोच माल शहरातील कारखान्यात पक्का झाला म्हणजे त्यांना तोच चौपट भावाने विकत घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकरी राजा कसा सुखी होईल? असा सवाल ग्रामगिताचार्य नारखेडे दादा यांनी उपस्थित केला. ते मंगळवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना बोलत होते.शेतकरी श्रम करून शेती पिकवितात. परंतु त्यांच्याच नशिबी उपाशी राहण्याची वेळ येते. त्यामुळे जगण्यासाठी त्यांना सतत कर्ज काढावे लागते. कर्ज काढून केलेल्या शेतीवर निसर्गाचाही कोप येतो. त्यामुळे जे कर्जाचे व्याजही भरु शकत नाहीत. शेती विकूनही ते कर्ज फेडू शकत नाही, असे ते म्हणाले.शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती साहित्य, खते बियाणांसाठी अनुदानावर अनेक योजना राबविल्या जातात. त्या मिळविण्यासाठी व घरापर्यंत आणण्यासाठी त्यांना शेतीची कामे सोडून प्रवास, वेळ खर्च करुन शासकीय कार्यालयाकडे चकरा माराव्या लागतात. कर्मचाऱ्यांची हाजी हाजी करावी लागते. प्रत्येक कामासाठी लाच घेतल्याशिवाय शेतकऱ्यांची कामे वेळवर होत नाहीत. अशा अनेक कारणांनी शेतकऱ्यांना आर्थिक गुलामगिरी व निसर्गाचा फटका सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना आत्महत्तेशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे महाभयंकर पाप राज्यवस्थेकडून होत असल्याचे दादा म्हणाले. आता तर पैशाअभावी आधुनिक पद्धतीने शेती उत्पादन करु शकत नाही. त्यामुळे शेती सोडून ती भांडवलदारांकडे द्या, असा उरफाटा सल्ला शेतकऱ्यांना दिला जात आहे. भांडवलदारांकडे शोषणाचा इतका अमाप पैसा आहे की, शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही, असे सांगून ेमनमानी भावाने त्यांच्या शेती खरेदी केल्या जात आहे. या चक्रात शेतकरी अडकत चालला आहे. शेती परवडत नाही म्हणून पैशाचे लोभाने शेतकरी सर्रास शेती विकत आहे. शेतकऱ्यांजवळ आलेला पैसा भांडवलदारांकडे परत येईल. अशा अनेक योजना भांडवलदाराकडे आहेतच. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीही जाणार व पैसाही जाणार शेतीचे सर्व श्रमावर आधारीत धंदे यंत्रावर होवू लागल्यामुळे तेही भांडवलदाराकडे गेले. त्यामुळे सर्व शेतकरी व श्रमिकांच्या हाताला कामच राहिले नाही, आता शेतकऱ्यांसहीत श्रमजीवी समाजाला स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी लाचारी पत्करावी का? असा सवालही नारखेडे दादा यांनी यावेळी उपस्थित केला. (वार्ताहर)