शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद पिकअप चालकाने तिघांना चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 05:00 IST

आष्टीकडून गोंडपिपरीकडे हे वाहन (क्रमांक एमएच ३३ जी ०५६०) भरधाव वेगाने येत होते. विशेष म्हणजे मुख्य हायवे सोडून हे वाहन गावाकडील रस्त्याने आले. रस्त्याच्या बाजुला असलेली नाली ओलांडत हे वाहन घरात घुसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या घराच्या अंगणात लहान चिमुकले खेळत होती. दरम्यान, पिकअप वाहन घरासमोरील शौचालयाच्या भिंतीला फोडून लहान मुलांच्या अंगावर चढले.

ठळक मुद्देएकाचा मृत्यू । दोन चिमुकले गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथे एका मद्यधुंद पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन चिमुकल्यांना चिरडले. यातील एक सात वर्षीय चिमुकली दवाखान्यात नेत असताना दगावली. तर दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास शुक्रवारी घडली.आष्टीकडून गोंडपिपरीकडे हे वाहन (क्रमांक एमएच ३३ जी ०५६०) भरधाव वेगाने येत होते. विशेष म्हणजे मुख्य हायवे सोडून हे वाहन गावाकडील रस्त्याने आले. रस्त्याच्या बाजुला असलेली नाली ओलांडत हे वाहन घरात घुसले. रस्त्याच्या कडेला असलेल्या पंढरी मेश्राम यांच्या घराच्या अंगणात लहान चिमुकले खेळत होती. दरम्यान, पिकअप वाहन घरासमोरील शौचालयाच्या भिंतीला फोडून लहान मुलांच्या अंगावर चढले. यात अलेशा पंढरी मेश्राम (७), अस्मित बंडू मेश्राम (१०) रा. नवेगाव वाघाडे, माही बंडू रामटेके (१२) रा. चंद्रपूर या तीन चिमुकल्यांना गंभीर दुखापत झाली. अलेशाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना तिचा मृत्यू झाला. तर माही आपल्या आजीकडे आली होती. तिलासुध्दा गंभीर दुखापत झाली. गाडी चालक व कंडक्टरसुद्धा गंभीर जखमी झाले असून त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात