शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात आठ हजार क्विंटल रेशनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो चना डाळ वितरीत करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे२१ हजार ३७० लाभार्थी : पंतप्रधान गरीब कल्याण योजना

मंगल जीवने ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : शासनातर्फे सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांसाठी पाच किलो तांदूळ व एक किलो डाळ मोफत देण्यात आले. त्यानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यात बल्लारपूर तालुक्यातील ६६ रास्तभाव दुकानदारांनी अंतोदय व प्राधान्य कुटुंबातील २१ हजार ३७० लाभार्थ्यांना सुमारे आठ हजार १४४.४ क्विंटल रेशन वाटप करण्यात आले.बल्लारपूर तालुक्यात १४ हजार ४९८ कुटुंबाकडे प्राधान्य कुटुंब लाभार्थी, एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक, सात हजार ४५४ पिवळी शिधापत्रिकाधारक आहेत. अंतोदय लाभार्थ्यांना १५ किलो गहू, २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना ५ किलो तांदूळ व १ किलो चना डाळ वितरीत करण्यात येत आहे. जून महिन्यात अंत्योदय योजनांच्या सुमारे सात हजार ३०७ लाभार्थ्यांना एक हजार ३६९ क्विंटल तांदूळ व ७३.०५ क्विंटल चण्याची डाळ, प्राध्यान्य कुटुंबातील १४ हजार ६५ कुटुंबांना २ हजार ७६४.०८ क्विंटल तांदुळ व १४०.६५ क्विंटल डाळ वाटप काण्यात आली. याप्रमाणे एप्रिल व मे महिन्यात धान्य वाटप करण्यात आले. तर मे व जून महिन्यात राबविण्यात आलेल्या आत्मनिर्भर योजनेतंर्गत बल्लारपूर तालुक्यातील एक हजार ५२२ कुटुंबातील ५ हजार ४०० व्यक्तीस ५४० क्विंटल तांदूळ व ३० क्विंटल चण्याची डाळ वाटप करण्यात आली.ग्राहकांना पावती द्यावीरेशन दुकानातून होणाऱ्या स्वस्त धान्याची विक्री अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील सर्व दुकानांमध्ये पॉस मशीन लावण्यात आली आहे. रास्तभाव दुकानदारांनी अन्नधान्य वाटप करताना त्या शिधापत्रिकेच्या क्रमांक, त्यावरील सदस्यांची संख्या तसेच शिधापत्रिकेवरील इतर संपूर्ण तपशील आदींच्या नोंदी स्वतंत्र नोंदवहीत ठेवायच्या आहेत. व धान्य घेतलेल्या ग्राहकास दुकानदाराने ई-पास मशीनची पावती देण्याचे निर्देश असताना अनेक रेशन दुकानदार ग्राहकास ही पावती देत नसल्याच्या तक्रार आहेत.खºया लाभार्थ्यापर्यंत अंत्योदय व अन्य योजतंर्गत स्वस्त दरातील धान्य पोहचावे व ग्राहकांना रीतसर ई-पास पावती देण्याचे आमचे निर्देश आहे. याचे उल्लंघन कोणी रेशन दुकानदार करीत असल्याची तक्रार आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.- प्रियंका खाडे, पुरवठा निरीक्षक,तहसील कार्यालय, बल्लारपूर

टॅग्स :Socialसामाजिक