शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST

सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ...

सिंदेवाही : यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरला आहे. अकाली पावसाने व मावा तुडतुडा यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे ३० दिवसांच्या आत देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

शेतकरी शेतमजूर महासंघाची सभा रघुनाथ शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शेतकऱ्यांनी खरीप धान पिकासाठी सहकारी संस्था, सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतले. यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनानुसार शेतकऱ्यांच्या कर्जामधून हेक्टरी ८५० रूपये विमा हप्ता कपात करण्यात आला. सदर हप्ता विमा कंपनीत जमा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या पिकास नैसर्गिक आपत्तीत नुकसानीसाठी विमा संरक्षण देण्यात आले. प्रति हेक्टर ४२ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई प्रधानमंत्री पीक योजनेत नमूद असून ३० दिवसांच्या आत पीक विमा शेतकऱ्यांना देणे कंपनीचे कर्तव्य आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पीक उभे केले. परंतु पीक हातात येताना अवकाळी पावसामुळे व मावा तुडतुडा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक नष्ट झाले. पीक वाचविण्याचे शेतकऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कित्येक शेतकऱ्यांनी धान पिकाची कापणी केली नाही. कुणाला हेक्‍टरी आठ तर कुणाला हेक्टरी दहा क्विंटल धानाचे उत्पादन झाले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार पिकाच्या नुकसानीसाठी सुरक्षा कवच ३० दिवसात मिळणार या आशेने शेतकरी वाट पाहून थकले. सदर विमा कवच शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी शेतकरी शेतमजूर महासंघाने केली आहे. सभेला तालुक्यातील ३५० शेतकरी उपस्थित होते. यात चंद्रशेखर चन्ने, जगन्नाथ महाजन,राजू ताडाम, दिनकर बोरकर, लोकमित्र गेडाम, ऋषी लोखंडे, लता गेडाम, यादव बोरकर,मयूर सुचक, अरुण कोलते, मुखरू बनसोड, जानकीराम वाघमारे,सुलभा कामडी आदींचा समावेश होता.