शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील कुटुंबावर छत्तीसगडच्या जातपंचायतीचे बहिष्काराचे फर्मान; मुलींनीच दिला पित्याला खांदा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 10:13 IST

Chandrapur : या प्रकरणी तक्रारीवरून मंगळवारी जातपंचायतीच्या छत्तीसगडमधील दोन व विदर्भातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रपूर : घरात दारिद्र्य आणि त्यातच २० वर्षांपासून बहिष्कृत जीवन जगताना आजाराने वडिलाचा रविवारी मृत्यू झाला. अखेरचा खांदा द्यायला समाज आला नाही. चंद्रपुरात गोंधळी (जोशी) समाजाची केवळ तीनच कुटुंबे आहेत. एवढ्या मोठ्या शहरात हे कुटुंब सहजपणे सुख-दु:ख वाटून घेऊ शकले असते. मात्र, बहिष्काराचे फर्मान बिलासपूर-रायपूर येथून आले आणि सर्वच दुरावले. या प्रकरणी तक्रारीवरून मंगळवारी जातपंचायतीच्या छत्तीसगडमधील दोन व विदर्भातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चंद्रपुरातील भंगाराम वॉर्डात मृत  प्रकाश गणपत ओगले यांचे कुटुंब राहते. त्यांना सात मुली व दोन मुले आहेत. एक मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. प्रकाश ओगले यांचा २० वर्षांपूर्वी समाजातीलच मुलीशी विवाह झाला होता. त्यावेळी जातपंचायत उपस्थित होती. काही दिवसानंतर आर्थिक स्थिती बिघडल्याने ओगले राजुरा येथे वास्तव्य करू लागले. समाजाशी संपर्क कमी झाला.

आर्थिक परिस्थिती थोडी बरी होऊ लागल्यानंतर पुन्हा समाजात वावर सुरू केला. त्यांची भाची व पुतण्याच्या लग्नासाठी जातपंचायतने सहकार्य केले होते. मात्र, जातपंचायतीशी संबंधित सुरेश वैराळकर महाजन या नागपूर येथील व्यक्तीने प्रकाश यांचे वडिल गणपत ओगले यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर बहिष्काराचा आदेश दिला. तेव्हापासून प्रकाश व त्यांचा भाऊ यांचे कुटुंब बहिष्कृत जीवन जगत आहेत.

मुलींनीच दिला पित्याला खांदा प्रकाश ओगले यांचा रविवारी मृत्यू झाल्यानंतर पीडित कुटुंबाने अंत्यसंस्काराबाबत जातपंचायतीला खूप गयावया केली. पण तुमचे वडील बहिष्कृत आहेत. त्यामुळे आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, असे फर्मान रायपूर व बिलासपूर येथील जातपंचायतीने काढले. त्यामुळे वडिलांच्या पार्थिवाला आम्हीच खांदा देऊन जातपंचायतीचा निषेध केला, अशी माहिती ओगले यांच्या सात मुलींनी दिली. 

संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिला. पण जातपंचायत आजही टिकविण्यामागे काहींचा स्वार्थ आहे. माझ्या बाबांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी समाज आला नाही. आम्ही भगिनींनी विधी पार पाडला. अनिष्ट प्रथांविरुद्ध यापुढेही लढत राहू.-जयश्री प्रकाश ओगले, मृताची मुलगी

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र