शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूरचा कलावंत गिनीजसह जागतिक पाच पुरस्कारांचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 9:34 PM

Chandrapur news ऑनलाईन पेंटिंग अपलोड या जागतिक स्पर्धेत चंद्रपुरातील प्रतिभावंत कलावंत व कलाशिक्षक डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जागतिक स्तरावरील पाच पुरस्कारांवर कर्तृत्वाची मोहोर उमटविली.

ठळक मुद्देपेंटिंग अपलोड करण्याचा विक्रमकलावंत विद्यार्थी घडविण्यातही अग्रेसर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रेडॉर फाउंडेशनने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी आयोजित

या स्पर्धेत विदेशातील ११२ देशांमधून २०० पेक्षा अधिक, तर भारतातून ९०० कलावंतांनी सहभाग घेतला होता.रेडॉर फाउंडेशनने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी २ मे २०२१ रोजी संध्याकाळी ७ ते रात्री ८ वाजता फेसबूकवर ऑनलाईन पेंटिंग अपलोड करण्याची स्पर्धा घेतली. स्वत: पेंटिंग करतानाचे छायाचित्र ऑनलाईन फेसबुकवर कसे अपलोड करावे, याचे जागतिक निकष तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारतातील २६ राज्यांच्या १८४ शहरांतून ९०० पेक्षा जास्त आणि जगातील ११२ देशांमधून २०० कलावंतांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातून चंद्रपुरातील कलावंत डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार यांनीही स्पर्धेत नाव नोंदविले. सहभागी कलावंतांनी एक हजार ४९ पेंटिंग्स ऑनलाईन फेसबुकवर अपडलोड केली. त्यामध्ये डॉ. सागरकुमार यम्पलवार यांचे पेंटिंग अव्वल ठरल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह जागतिक स्तरावरील अन्य पाच पुरस्कारांचा मानकरी ठरले आहेत.

असे होते स्पर्धेचे निकषएका फेसबुकवर आयडीवरून एकच पेंटिंग अपलोड करणे, पेंटिंग अपलोड करताना हातात केवळ ब्रश असावा, दुसरे कुठलेही डबल टूल्स कलावंतांना वापरता येणार नाही. जागतिक निकषानुसार अपलोड होणारे हे पेंटिंग उत्तम दजार्चेच असावे, यासह अन्य निकषांतही चंद्रपूर येथील डॉ. यम्पलवार यांची कलाकृती पुरस्काराठी पात्र ठरली आहे.जयपूर येथे चित्रप्रदर्शनडॉ. यम्पलवार हे बल्लारपूर शहराजवळील बामणी येथील माऊंट पोर्ट स्कूलमध्ये कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन जयपूर व देशातील अन्य महानगरांमध्येही भरविण्यात आले. जागतिक वॉटरकलर चित्रकला संघटनेचे ते सदस्य असून, राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत.जागतिक स्तरावरील अशा प्रकारची ऑनलाईन स्पर्धा कला क्षेत्रात अत्यंत कठीण मानली जाते. अध्यापनाचे कार्य करीत असताना कलेच्या विविध पैलूंचा बारकाईने अभ्यास केला. त्यामुळे या पुरस्कारांचा मानकरी ठरू शकतो. चित्रकलेत मुले कुठेही कमी पडू नयेत, यासाठी मी पुन्हा परिश्रम घेणार आहे.- डॉ. सागरकुमार अरुण यम्पलवार, पुरस्कारविजेता, चंद्रपूर

टॅग्स :artकला