शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मोतिबिंदू रुग्णांसाठीचे अनुदान थांबविले

By admin | Updated: December 28, 2015 01:21 IST

हजारो-लाखो गरजू व अंध मोतिबिंदू रुग्णांना विविध सेवाभावी संस्थामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या मोतीबिंदू ...

दृष्टी मिळणार कशी ? : सेवाभावी संस्थांचा शिबिर आयोजनास नकारनितीन मुसळे सास्तीहजारो-लाखो गरजू व अंध मोतिबिंदू रुग्णांना विविध सेवाभावी संस्थामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून दृष्टी मिळण्याचे अमूल्य कार्य घडत होते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे या कार्यावर विरजण पडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अशा मोतिबिंदू शिबिराकरिता सेवाभावी संस्थांना देण्यात येणारे आवश्यक सानुग्रह अनुदान मागील दोन वर्षांपासून वितरीत न केल्यामुळे अशा शिबिराचे आयोजन रद्द करण्यात येत आहे. यामुळे गरीब गरजू व अंध मोतिबिंदू रुग्णांना दृष्टीपासून वंचित राहावे लागणार आहे.राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजना सन १९७६ सालापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून १०० टक्के अनुदान देण्यात येत होते. केंद्र शासनाच्या आदेशानुसार सन २०१२-१४ पासून राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण, अनुसूचित जाती विशेष घटक योजना व जनजाती क्षेत्र उपयोजना यासाठी केंद्र शासनाकडून ७५ टक्के व राज्य शासन २५ टक्के याप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे. या अनुदानांतर्गत राज्यातील सेवाभावी संस्थाच्या मार्फत गरजू व अंध मोतिबिंदू रुग्णांना दृष्टी मिळावी, या हेतूने मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत होते. या शिबिराच्या माध्यमातून राज्यातील हजारो- लाखो रुग्णांना दृष्टी मिळत होती व हे सुंदर जग ते पाहू शकत होते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे मात्र हे अंध रुग्ण दृष्टीपासून वंचित राहणार आहेत. शासनाने मागील दोन वर्षांपासून या सेवाभावी संस्थांना देण्यात येणारे सानुग्रह अनुदान वितरित केले नाही. त्यामुळे या सेवाभावी संस्थांनी अशा प्रकारच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजनास नकार दिला असून निधी मिळेपर्यंत आयोजन केले जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. शासन विविध ठिकाणी अनावश्यक खर्च करते. विकासाच्या नावावर कोट्यवधीचा निधी वितरीत केला जातो. अनेक ठिकाणचा निधी व्यर्थ जात आहे. परंंतु इतर योजनांचे निधी थकीत न ठेवता राज्यातील अंध व गरजू मोतिबिंदू रुग्णांचा निधी थकीत ठेवल्याने मोतिबिंदू रुग्णांना मोठा फटका बसला आहे. सेवाभावी संस्था मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करते. त्या शस्त्रक्रियेस येणाऱ्या चार हजार रुपयांच्या खर्चातील ५० टक्के रक्कम म्हणजे दोन हजार रुपये संस्थेमार्फत केले जाते तर ५० टक्के खर्च म्हणजे दोन हजार रुपये शासनाकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानातून केले जाते. परंतु शासनाच्या उदासिन धोरणामुळे मागील दोन वर्षांपासून या सानुग्रह अनुदानाचे वितरण झाले नाही. त्यामुळे या सेवाभावी संस्था अडचणीत आल्या असून त्यांनी अशा प्रकारच्या शिबिराच्या आयोजनास नकार दर्शविला आहे.राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील श्री तिरुपती बालाजी देवस्थानाच्या पुढाकाराने ब्रह्मोत्सव कार्यक्रमात मेडिकल कॉलेज सेवाग्राम व लॉयन्स क्लब चंद्रपूरच्या सहकार्याने दरवर्षी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या थकीत निधीमुळे शिबिर रद्द होण्याच्या मार्गावर होते. परंतु अधिवेशन काळात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची १० डिसेंबरला प्रत्यक्ष भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावेळी डॉ. शुक्ला व त्यांच्या चमूही सोबत होत्या. मुनगंटीवारांनी या थकीत निधीचे त्वरित वितरण केले जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे चुनाळा येथील हे शिबिर होऊ शकले, अशी माहिती श्री तिरुपती बालाजी देवस्थान चुनाळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिली.