शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

विसापूरच्या हद्दीत साकारतेयं शैक्षणिक हॅब

By admin | Updated: May 4, 2015 01:21 IST

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात शैक्षणिक हॅब साकारण्यात येत आहे.

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात शैक्षणिक हॅब साकारण्यात येत आहे. यात एका खासगी तर तीन शासकीय संस्थाच्या शाळेचा समावेश आहे. यासाठी राजस्व विभागाने १८६ एकर जागा अधीग्रहीत करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण केली आहे. यामुळे विसापूरची ओळख शैक्षणिक हॅब म्हणून निर्माण होऊ लागली आहे.बल्लारपूर-चंद्रपूर राज्य महामार्गावर सन १९९५-९६ मध्ये सर्व्हे क्रमांक ९०, ९१ व ९२ मधील ४५ एकर जमिनीवर सन्मित्र मंडळाच्या वतीने सैनिकी शाळा सुरू करण्यात आली. येथे १२ वीपर्यंत सुविधा करण्यात आली. याच हद्दीत सर्व्हे क्रमांक १०७/२ मधील ३.२० हेक्टर आर जमीन अधिग्रहीत करून दोन वर्षापासून समाज कल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुलांसाठी निवासी शाळा सुरू आहे. निवासी शाळेला लागून सर्व्हे क्रमांक १०७/१ मधील ४.१२ हेक्टर जमिनीवर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आकारास येत आहे. या आयटीआयचे बांधकाम प्रगतीवर आहे.विसापूरच्या हद्दीतील भिवकुंड परिसरात तब्बल १२३ एकर विस्तारित जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील दुसरी सैनिकी शाळा सुरु करण्यासाठी हालचालींनी वेग घेतला आहे. या संदर्भात राज्याच्या मंत्रीमंडळाने ९ एप्रिलला ठराव घेऊन विधानसभेचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडे सुर्पूद केला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्याचे ले. जनरल राजेंद्र निबोंळकर, प्रभारी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, उपविभागीय अधिकारी कल्पना निळ, प्रभारी तहसीलदार विकास अहीर यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली.येथील प्रस्तावित केंद्रीय सैनिकी शाळेसाठी राजस्व विभागाने बल्लारपूर तलाठी साज्यातील सर्व्हे क्रमांक ९४, ९५, ९६, ९७, ९८, १०५, १०८, १०९, ११०, १११, ११३, ११४ मधील एकूण ४९.१५ हेक्टर आर. जमीन उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी राज्य सरकारला दिला आहे. या जागेचे क्षेत्रफळ १२३ एकराचे असल्याचे सांगीतले जात आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने राज्यातील सातारा येथे २३ जून १९६१ ला पहिली सैनिकी शाळा सुरू केली. त्याच धर्तीवर दुसरी सैनिकी शाळा चंद्रपूर जिल्ह्यात दुसरी शाळा सुरू होणार आहे. येथील प्रस्तावित सैनिकी शाळा विदर्भासाठी व नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी विकासात्मक मैलाचा दगड ठरणारी असून राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र म्हणूनही ओळखली जाणार आहे. या सैनिकी शाळेच्या माध्यमातून तयार झालेले विद्यार्थी संरक्षण सेवा, पोलीस सेवा, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सामाजिक सेवा यासोबतच आर्मी, नेव्ही व एअरफोर्स सारख्या उच्च पदावर जाण्यास हातभार लावणारे ठरणार आहे. विविध क्षेत्रात नाव लौकीक मिळवून देणारे विद्यार्थी सैनिकी शाळेच्या माध्यमातून बाहेर पडणार आहेत. उच्चपदस्थ अधिकारीही यातून निर्माण होतील व देशसेवेला यामुळे मदत होणार आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.