शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपलेल्या ७५ ग्रामपंचायतींवर पुढील आठवड्यात प्रशासक राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:20 IST

चंद्रपूर : राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांतील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत येत्या २१ जुलैला संपणार आहे. कोविड महामारीमुळे सार्वत्रिक ...

चंद्रपूर : राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांतील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत येत्या २१ जुलैला संपणार आहे. कोविड महामारीमुळे सार्वत्रिक निवडणुका घेण्याची शक्यताच नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुढील आठवड्यापासून प्रशासक नियुक्तीचा आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी १२ जुलै २०२१ रोजी जारी केला. या निर्णयामुळे निवडणुका लढविण्यासाठी बाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याची चर्चा आहे.

राज्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. शिवाय, सरकार व आरोग्य तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिल्हा परिषदच्या ८५ आणि पंचायत समितीच्या १४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, याच कालावधीत राज्यात कोरोना डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळले. ओबीसी आरक्षणावरूनही राजकीय घुसळण सुरू झाली. आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. परिणामी, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद निवडणुका रद्द केल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे राजूरा, कोरपना व जिवती तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत संपलेल्या गावांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसेच शासन निर्णयानुसार प्रशासक नियुक्ती करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी नुकतीच पूर्ण केली. १२ जुलै २०२१ रोजी याबाबतचा आदेश जारी केला. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये दुसऱ्याच दिवशी नियुक्त प्रशासकांनी कारभार हाती घ्यावा, असे निर्देशही दिले आहेत.

मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

कोरपना : बेलगाव, बिबी, चनई, धानोली, दुर्गाडी, जेवरा, कन्हाळगाव, कातलाबोडी, खैरगाव, खिर्डी, कोठोडा बू. लखमापूर, मांडवा, मांगलहिरा, नांदा, पारडी, परसोडा, पिंपळगाव, पिपर्डा, रूपापेठ, सावलहिरा, सोनुर्ली, थुट्रा, उपरवाही, वडगाव, वनसडी

प्रशासकांना सरपंचाचे अधिकार

प्रशासकपदी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीने इतरत्र पदस्थापना झाली असेल त्याठिकाणी त्यांच्या जागेवर बदलीने येणाऱ्यांनी प्रशासक म्हणून आपोआप नेमणूक झाल्याचे गृहीत धरण्यात येईल. रुजू झाल्यानंतर विनाविलंब तसा अहवाल जि.प.ला सादर करावा लागणार आहे. नियुक्त प्रशासकांना निवडणुका होईपर्यंत सरपंचाचे सर्व अधिकार लागू आहेत.

कोट

राजुरा, जिवती व कोरपना तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत २१ ते २५ जुलै २०२१ दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी झाला. नियुक्त प्रशासकांनी संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार हाती घेऊन तसा अहवाल पंचायत समितीला सादर करावा लागणार आहे.

-कपिल कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपूर