शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

११ आरटीआय कार्यकर्ते नोटीस बोर्डावर

By admin | Updated: May 6, 2015 01:23 IST

माहितीच्या अधिकार कायद्याचा आधार घेत काही स्वयंघोषित आरटीआय कार्यकर्ते शासकीय कार्यालयातून वारंवार माहिती मागून अधिकारी व कर्मचाऱ्यांना भंडावून सोडत होते.

वरोरा : माहितीच्या अधिकार कायद्याचा आधार घेत काही स्वयंघोषित आरटीआय कार्यकर्ते शासकीय कार्यालयातून वारंवार माहिती मागून अधिकारी व कर्मचाऱ्यांना भंडावून सोडत होते. यातील अनेक अर्जातील माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले. अशा ११ व्यक्तींची तक्रार राज्याच्या माहिती आयुक्तांकडे लेखी पुराव्यासह करण्यात आली असून या ११ व्यक्तीच्या नावांची यादी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आली आहे. त्यांना यापुढे माहिती देण्यात येणार नाही, असे या फलकावर स्पष्टपणे बजावण्यात आल्याने कायद्याचा दुरूपयोग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार नागरिकांना शासकीय, निमशासकीय कार्यालयातून माहितीचा अधिकारात माहिती मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्यानंतर अनेक कार्यालयातून सार्वजनिक हिताच्या माहिती मागून त्यावर उपाययोजना करीत अनेक नागरिकांना सार्वजनिक कामे हिताचे झाले यापलीकडे जावून काही व्यक्तींनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना हाताशी धरीत माहितीच्या अधिकारातून माहिती मागण्याचा सपाटा सुरू केला. यामधील अनेक अर्जातील माहितीमध्ये तथ्यांश नसल्याने माहिती शोधण्याकरिता कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक वेळ व्यर्थ ठरत असल्याने कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. कार्यालयाची कामे खोळंबली आहे.वरोरा तालुक्यात मागील दोन वर्षात ११ व्यक्तींनी अनेक कार्यालयात वारंवार माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली असल्याचे दिसून येते. माहिती मागताना वैयक्तिक माहितीवर अधिक भर असल्याचे त्यांचा अर्जावरुन दिसून येत आहे. माहिती देण्यास तयार करुन कार्यालयातून माहिती घेण्यास बोलाविलेत सता अर्जदार माहिती घेऊन जात नसल्याचे अनेक प्रकरणातून दिसून आले. सर्वाधिक माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद कार्यालातून मागण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)