शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार तरुणांनो त्वरा करा! अ‍ॅमेझॉन इंडिया भरणार २० हजार कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 03:11 IST

आगामी सहा महिन्यांचा काळ हा सणासुदीचा काळ असून, जागतिक पातळीवर सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉन इंडिया आपल्या ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिस) शाखेत २० हजार हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीच्या वतीने अधिकृतरीत्या ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी सहा महिन्यांचा काळ हा सणासुदीचा काळ असून, जागतिक पातळीवर सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यानुसार आपल्या वेबसाइटवरील ऑनलाइन खरेदी वाढणार असल्याचा कंपनीचा अंदाज आहे. त्यानुसार नवी भरती केली जाणार आहे. ही भरती हैदराबाद, पुणे, कोईमतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ आणि लखनौ या शहरांसाठी होणार आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून, त्यासाठी ही भरती केली जात आहे. यातील बहुतांश पदे ‘कस्टमर सर्पोट व्हर्टिकल्स’मधील आहेत. बारावी पास मुलेही यासाठी अर्ज करू शकतात. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू अथवा कन्नड या भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

कंपनीने म्हटले की, ग्राहक सेवा संस्थेत आमच्या संख्याबळाच्या गरजांचा आम्ही सातत्याने आढावा घेत असतो. त्यानुसार भरतीचे निर्णय घेतले जातात. भारतीय आणि जागतिक सुट्यांच्या हंगामामुळे आगामी सहा महिन्यांत ग्राहकही वाढणार आहे. त्यासाठी आवश्यक संख्याबळाची कंपनीची गरजही वाढणार आहे.२०२५ पर्यंत एक दशलक्ष नवे रोजगारअ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे संचालक अक्षय प्रभू यांनी सांगितले की, नव्याने भरती होणाºया कर्मचाऱ्यांना कंपनी कार्यालयातून अथवा घरी बसून कंपनीच्या आभासी ग्राहक सेवा कार्यप्रणालीवर काम करावे लागेल. २०२५ पर्यंत भारतात एक दशलक्ष नवे रोजगार निर्माण करण्याची अ‍ॅमेझॉनची योजना आहे. त्यासाठी कंपनी बाजारात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपाचे जे काही रोजगार तयार होतील, ते बहुविध उद्योग क्षेत्राशी संबंधित असतील. त्यात माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, मजकूर निर्माण, किरकोळ विक्री, रसद आणि वस्तू उत्पादन यांचा समावेश आहे. मागील सात वर्षांत अ‍ॅमेझॉनने भारतात ७ लाख रोजगार निर्माण केले आहेत.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन