शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंप वीज जोडणीचे दोन हजार प्रस्ताव प्रलंबित!

By admin | Updated: April 18, 2017 00:44 IST

पंधरा उपविभागातील स्थिती: खरीप हंगाम प्रभावित होण्याची शक्यता

नीलेश शहाकार - बुलडाणामान्सूनपूर्व वीज जोडणी व दुरुस्तीची कामे १५ दिवसांत पूर्ण करा, असे आदेश महावितरणला राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले. शेतकरी खरीप पेरणीच्या उंबरठ्यावर असताना जिल्ह्यात कृषी पंप वीज जोडणीचे २२६४ प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्णत: पावसावर अवलंबून असला तरी ऐनवेळी पावसाने पाठ फिरवली की, शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाचा आधार द्यावा लागतो. शिवाय शेताच्या मशागतीसाठीसुद्धा वीज आवश्यक आहे.जिल्ह्याचा खरीप हंगामपूर्व नियोजन आराखडा १३ एप्रिल रोजी सादर करण्यात आला. यानुसार जिल्ह्यातील पंधरा उपविभागात २ हजार २६२ कृषी पंप वीज जोडणी अर्ज प्रलंबित असल्याची बाब पुढे आली. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात ९ हजार ३०३ शेतकऱ्यांनी कृषी पंप वीज जोडणीसाठी महावितरण कार्यालयाकडे अर्ज केले होते. मार्च २०१७ अखेरपर्यंत ७ हजार अर्जाबाबत कार्यवाही करण्यात आली, तर इतर अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत.विभागात २१ हजार अर्ज प्रलंबितगत पाच वर्षांपासून विदर्भातील शेतकरी दृष्टचक्रात अडकला आहे. यातून सोडविण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. अमरावती विभागातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील कृषी पंप वीज जोडणीचे प्रलंबित अर्जाची संख्या २१ हजार २५९ एवढी आहे़