शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 20:05 IST

Two children drowned in a farmland pond : अमर शंकर बनसोडे (१४) आणि टिंकू परमेश्वर बनसोडे (१२) या दोघांचा मृत्यू झाला आहे.

धोत्रानंदई (जि. बुलडाणा) : देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बुद्रूक येथे शेततळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ७ जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, तिसऱ्या मुलास वाचविण्यास स्थानिकांना यश आले असून, त्यास जालना येथे उपचारांसाठी हलविले आहे.

यामध्ये अमर शंकर बनसोडे (१४) आणि टिंकू परमेश्वर बनसोडे (१२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, टिंकूचा भाऊ सुमित परमेश्वर बनसोडे याचे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहे. त्यास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश चेके, भुजंग चेके, जगदेव चेके, गजानन चेके यांनी तातडीने देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी हलविले. तेथून त्यास जालना येथे पुढील उपचारांसाठी पाठविले आहे. उपरोक्त तिघे भावंडे ही शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेली होती. दोघे पाण्यात बुडत असताना सुमितने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही पाण्यात बुडत असताना त्याने आरडाओरड केल्याने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यामुळे सुमितचे प्राण वाचविण्यात यश आले. दरम्यान, अन्य दोघा मृतकांचे पार्थिव हे देऊळगाव मही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राठोड यांनी लगोलग घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे वाकी बुद्रूक गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा