शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:25 IST

समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोलनाका जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मलकापूर पांगरा (बुलढाणा) : समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोलनाका जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २० फेब्रुवारी राेजी सकाळी ९ वाजता घडली़.

समृद्धी महामार्गावर कार क्रमांक एमएच ०४ एलबी ३१०९ मुंबईवरून अकोल्याच्या दिशेने जात हाेती़ दरम्यान चॅनेल क्रमांक ३१८.८ वर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार मीडियनमधील क्रॅश बॅरिअरला धडकली आणि बॅरिअरची लोखंडी पट्टी कारच्या समोरून घुसून मागील बाजूने बाहेर पडली. यानंतर कारने पेट घेतला. या अपघातात गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) आणि राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२), दोघेही रा़ मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला.

कारचा चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५, रा़ मुंबई) गंभीर जखमी असून, त्याला तातडीने बीबी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग रुग्णवाहिका सेवेचे डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच समृद्धी महामार्ग क्युआरव्ही टीम, महामार्ग पोलीस, किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरवाडे, देऊळगाव राजा उपविभागाच्या उपविभागीय पाेलीस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई केली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा