शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोथळी येथील सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव पारित

By admin | Updated: April 17, 2017 00:38 IST

मोताळा: तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा महेंद्र जाधव व उपसरपंच वंदना ज्ञानेश्वर राजगुरे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव शनिवारी बहुमताने पारित झाला.

मोताळा: तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा महेंद्र जाधव व उपसरपंच वंदना ज्ञानेश्वर राजगुरे यांच्याविरुद्ध दाखल झालेला अविश्वास ठराव शनिवारी बहुमताने पारित झाला. तेरा पैकी नऊ सदस्यांनी हात उंचावून अविश्वास ठरावाच्या बाजून मतदान केल्यामुळे सरपंच व उपसरपंचाला पदावरून पायउतार व्हावे लागले. १५ एप्रिल रोजी ग्रामपंचायतमध्ये आयोजित या अविश्वास सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रूपेश खंदारे होते. तेरा सदस्य संख्या असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच सीमा जाधव व उपसरपंच वंदना राजगुरे हे सदस्यांना विश्वासात घेत नाही व मनमानी कारभार करतात या व इतर कारणांवरून ग्रा. पं. सदस्य प्रशांत उत्तम वाघोदे, भास्कर कौतिकराव तायडे, गोपाळ सुधाकर पाटील, शेख शकील शे. शरीफ व अरविंद वामन महाकाळ या पाच सदस्यांनी ११ एप्रिल रोजी तहसीलदार खंदारे यांच्याकडे सरपंच व उपसरपंचाविरुद्ध प्रस्ताव दाखल करून अविश्वास दर्शविला होता. या अविश्वास प्रस्तावावर आज १५ एप्रिल रोजी कोथळी ग्रा.पं. कार्यालयात विशेष सभा बोलावून चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा अध्याशी अधिकारी यांनी ठरावावर मतदान घेतले असता, ठराव दाखल करणाऱ्या पाच व इतर चार असे नऊ सदस्यांनी हात उंचावून अविश्वासाच्या ठरावाच्या बाजूने सहमती दर्शविल्याने तहसीलदार रूपेश खंदारे यांनी सरपंच व उपसरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पारित केल्याचे घोषित केले. अविश्वास ठरावाच्या बाजूने भास्कर तायडे, गोपाळ पाटील, अरविंद महाकाळ, पौर्णिमा वाघोदे, प्रशांत वाघोदे, कमल इंगळे, विद्या गावंडे, शे. शकील शे. शरीफ व एैनुरबी लुकमानशा या नऊ ग्रा. पं. सदस्यांनी मतदान केले. तर यास्मीनबी शे. सलीम, शे. सलीम शे. हासम या दोन सदस्यांसह सरपंच व उपसरपंच गैरहजर राहिले.