शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करा- सदाभाऊ खोत

By admin | Updated: April 18, 2017 00:47 IST

बुलडाणा- शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी दिले.

बुलडाणा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणाजवळील फिल्टर प्लाण्टमधील रोटर नादुरूस्त असल्यामुळे शहराला शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नाही. या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातील रोटर त्वरित बदलविण्यात यावे, तसेच शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी दिले. येळगाव जलाशयाजवळील पाणी शुद्धीकरण यंत्र बंद असल्याबाबत काही नागरिकांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री यांना निवेदन दिले. मंत्र्यांनी तत्काळ या निवेदनाची दखल घेत दौऱ्यादरम्यान या जलाशयाजवळील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. याप्रसंगी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा शाखेचे अभियंता यांना कडक शब्दात सूचना देताना राज्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, नगरपालिकेचे पाणीपुरवठा शाखेचे राजेश गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते. शुद्ध पाणीपुरवठा करून शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ ठेवण्याचे आवाहन करीत राज्यमंत्री खोत म्हणाले की, जलाशयामध्ये पाणी असताना शुद्ध व मुबलक पाण्याचा पुरवठा करावा. रोटरमध्ये अडकलेला गाळ पूर्ण काढून घेण्यात यावा. या गाळामुळे पाणी शुद्धीकरण व्यवस्थित होत नाही, तरी याबाबत सर्व काळजी नगरपालिकेने घ्यावी. या रोटरचे त्वरित अंदाजपत्रक सादर करून रोटर बसवून घेण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.