शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना लोकवर्गणी देण्यास पालकांचा नकार!

By admin | Updated: April 18, 2017 00:08 IST

चार संगणक संच, प्रोजेक्टर बंद असताना पुन्हा खटाटोप

सोनाळा : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील चार संगणक संच व एक प्रोजेक्टर बंद अवस्थेत ठेवून पालकांसमोर ई-लर्निंगकरिता पुन्हा लोकवर्गणी मागायला सुरुवात केली. मात्र, मागील अनुभव पाहता पालक शिक्षकांना थेट नकार देत असून, त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत. त्यामुळे शिक्षकांवर पश्चात्तापाची पाळी आली आहे.येथील पोस्ट आॅफीसजवळ जिल्हा परिषद मुलांची केंद्र शाळा आहे. शाळेत १ ते ७ वर्ग आहेत. यामध्ये १४ शिक्षक ४२४ विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांकरिता जिल्हा परिषद कोट्यामधून २०१० मध्ये पाच संगणक संच मिळाले होते. पण, ते शाळेतून गायब झाले होते. २०१४ मध्ये १५ हजार रुपयांची लोकवर्गणी शिक्षकांनी गोळा करून पुन्हा डिजिटल रूम तयार केली. पण, या डिजिटल रूममध्ये आजतागायत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी पाऊल ठेवले नसल्याचे बोलल्या जात आहे. २०१५ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक प्रोजेक्टर व एक लॅपटॉपही शाळेला दिले आहे. पण, हे प्रोजेक्टर व लॅपटॉप एका शिक्षकाने घरी नेवून त्याचा उपयोग करीत असल्याचे समोर आले आहे. शाळेत चार संगणक संच, एक डिजिटल प्रोजेक्टर व लॅपटॉप असतानाही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.सदर बाब माहिती पडल्याने काही पालक शिक्षकांना वर्गणी देताना अनेक प्रश्नांचा भडीमार करताना दिसतात, तर काही पालक शिक्षकांना लोकवर्गणीकरिता थेट नकार देत आहेत. यामुळे पालकांच्या दारावरून शिक्षकांना लोकवर्गणीविना परतावे लागत आहे व त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ आली आहे.लोकवर्गणीतून टीव्ही स्क्रीन मुख्याध्यापक व शिक्षकांनी ई-लर्निंगकरिता टी.व्ही. स्क्रीनचा नवा फंडा लोकवर्गणीचा वापरल्यामुळे वर्गणीदारच पेचात सापडले आहेत. लोकवर्गणीतून आणलेल्या टी.व्ही. स्क्रीनची अवस्थासुद्धा शाळेत असलेल्या संगणक संच, प्रोजेक्टर व लॅपटॉपप्रमाणे, तर होणार नाही ना, अशी शंका पालकांना येत आहे.