जि.प. निवडणुकीत महायुती, मविआ थेट लढतीची शक्यता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 00:26 IST2026-01-22T00:22:19+5:302026-01-22T00:26:12+5:30

ZP election 2026: केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलिकीडल काळातील वक्तव्यावरून तसे संकेत मिळत आहेत.

In the ZP elections, Mahayuti, Mavia likely to face off directly, but the role of both the NCP groups is in the bouquet | जि.प. निवडणुकीत महायुती, मविआ थेट लढतीची शक्यता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात

जि.प. निवडणुकीत महायुती, मविआ थेट लढतीची शक्यता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात

बुलढाणा पालिका निवडणुकीत दोस्तीत कुस्ती खेळल्यानंतर आता महायुतीमधील पक्ष जिल्हा परिषद निवडणूकीत एकत्र लढण्याचे संकेत देत असताना महाविकास आघाडीही या निवडणुकांना एकसंधपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अलिकीडल काळातील वक्तव्यावरून तसे संकेत मिळत आहेत.

चिखली पालिकेतील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महायुती जिल्हापरिषद झेंडा फडकवेल असे वक्तव्य केले होते. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष वगळता आगामी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेण्याचे वक्तव्य केले. परिणामी जिल्हा परिषदेतील लढत आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत होऊ शकते.

जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपची ताकद ही मिनी मंत्रालयाचा विचार करता जवळपास समसमान आहे. अशा स्थितीत शिंदेसेनेलाही भाजपची साथ हवी आहे. शिंदेसेनेची ताकत घाटावर अधिक आहे, तर घाटाखाली तुलनेने कमी आहे.

त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना घाटावर व घाटाखाली आपसी समतोल राखून जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत बसण्याचे मनसुबे ठेवून आहे. त्यांच्या व्युव्हरचनेचा एक भाग म्हणून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राजकीय डावपेचांच्या आखाड्यात उडी मारली आहे.

भाजप जोशात

पालिका निवडणुकीत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनलेली भाजप सध्या चांगल्याच जोशात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही हाच कित्ता कायम ठेवत झेडीपत यंदा सलग पाच वर्षे सत्ते बसण्याची मानसिकात भाजप ठेवून आहे. त्यामुळे प्रसंगी महायुतीमधील शिंदेसेनेला ते सोबत घेऊन लढण्याची शक्यताही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

शिंदेसेनेकडून नेत्यांच्या मुलांना झुकते माप ?

शिंदेसेनेकडून बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा तालुक्यात प्रसंगी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आजी, माजी आमदारांच्या मुलांचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीद्वारे राजकारणात प्रवेश करण्याचे प्रयत्न होत आहे. मोताळा तालुक्यातील एक, मेहकर, लोणारमधील प्रत्येकी एक गट आणि देऊळगा वराजा तालुक्यातील एका गटात त्यादृष्टीने शिंदेसेनेच्या नेत्यांकडून चाचपणी होत आहे.

Web Title: In the ZP elections, Mahayuti, Mavia likely to face off directly, but the role of both the NCP groups is in the bouquet