शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पाहुणी म्हणून आलेल्या अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 15:11 IST

पाहुणी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी बलात्कार केल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी उघडकीस आली

ठळक मुद्दे मुलीस त्याच्या दुचाकीवर बळजबरीने बसवून गावा लगतच्याच करडी धरणालगत नेले.सोबतच तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या चार मित्रांनीही नंतर तेथेच अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कधाड: मराठवाड्याच्या सीमेलगत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील करडी धरणालगत बाहेरगावाहून पाहुणी म्हणून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी बलात्कार केल्याची घटना २२ आॅगस्ट रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार असून धाड पोलिस त्यांचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना बुलडाणा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील एका तालुक्यातून बुलडाणा शहरापासून सुमारे ३१ किमी अंतरावर असलेल्या धाड येथे एक अल्पवयीन मुलगी २० आॅगस्ट रोजी आपल्या नातेवाईकाकडे आली होती. धाड येथील बसस्थानकावर ती उतरली होती. दरम्यान बसस्थानकावर असलेल्या राहूल लोखंडे याने अल्पवयीन मुलीस त्याच्या दुचाकीवर बळजबरीने बसवून गावा लगतच्याच करडी धरणालगत नेले. सोबतच तेथे तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आपला कार्यभाग साधल्यानंतर राहूल लोखंडे याने त्याच्या चार मित्रांनाही तेथे बोलावून घेतले. या चार मित्रांनीही नंतर तेथेच अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. सागर गुजर, अक्षय पवार, शुभम पांदे, गणेश जाधव अशी अन्य चार आरोपींची नावे आहेत.पीडित मुलीने धाड पोलिस ठाण्यात २१ आॅगस्ट रोजी तक्रार दिली. प्रकरणाचे गांभिर्य पाहता धाड पोलिसांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करत घटनास्थळाचा पंचनामा करून राहूल लोखंडे, शुभम पांदे, गणेश जाधव या तिघांना अटक केली आहे. दरम्यान, अन्य दोन आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहे. धाड पोलिस त्यांचा शोध घेत आहे.या प्रकरणी धाड पोलिसांनी २१ आॅगस्ट रोजी रात्री उशिरा बलात्कारासह, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना बुलडाणा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दुसरीकडे पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणीही बुलडाणा येथेच करण्यात आली असल्याची माहीती पोलिस सुत्रांनी दिली. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह बळीराम खंडागळे, ओमप्रकाश सावळे, प्रकाश दराडे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी