शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ची कामे पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:10 IST

पालकमंत्र्यांचा आदेश: जलयुक्त शिवार अभियान व पाणीटंचाई आढावा बैठक

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये निवडलेल्या गावांमध्ये जलसंधारण व मृदसंधारणाची कामे करण्यात आली. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध उपचारांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करण्यात आली. या कामांच्या माध्यमातून सिंचन क्षमता निर्माण झाली. जी कामे अपूर्ण आहेत, जे गावे १०० टक्के जलयुक्त झाले नाही, अशा गावांमधील जलयुक्त शिवार अभियानातील कामे पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी प्रशासनाला दिली. जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीचे १५ एप्रिल रोजी आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ आदी उपस्थित होते, तर सभागृहात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कार्यकारी अभियंता कोंडेवार, उपविभागीय कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी आदी उपस्थित होते.जिल्ह्यात सद्यस्थितीत असलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्यांचा सर्वे करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, जी कोल्हापुरी बंधारे दुरुस्त किंवा पाणी साठविण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत, अशा बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यात यावे. या प्रकारच्या बंधाऱ्यांचे अंदाजपत्रक त्वरित सादर करावे. पावसाळा लागण्यापूर्वी ढाळीचे बांधची कामे पूर्ण करावी. पावसानंतर अशी कामे होत नाहीत आणि त्यांचा काही उपयोग होत नाही. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी बैठकीत माहिती दिली. सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, सर्व गावांमध्ये जलयुक्तची कामे सुरू आहेत. त्यापैकी १५२८ कामे पूर्ण झाली आहेत, तर ३४१ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारच्या बैठकीनंतर पाणीटंचाई आढावा बैठक पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता विविध उपाययोजना कराव्यात. पाणीटंचाईमुळे कुठल्याही गावात तीव्र स्वरुपाची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. विहीर, विंधन विहीर अधीग्रहण व टँकरची मागणी असल्यास असे प्रस्ताव तत्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावे. ते म्हणाले की, गत वर्षातील पाणीटंचाईमध्ये अधिग्रहित केलेल्या विहीरमालकांना त्यांचे पैसे त्वरित देण्यात यावे. कुठल्याही गावामध्ये पैसे देण्याचे काम प्रलंबित ठेवू नये. याप्रसंगी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता राजपूत, तहसीलदार, संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.