शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:58 IST

यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

चिखली : भाजप आमदार श्वेता महाले यांना तीन निनावी पत्रांद्वारे जीवघेण्या धमक्या देण्यात आल्या असून, त्यामध्ये अत्यंत क्रूर भाषेचा वापर करत 'सर तन से जुदा' अशा प्रकारची चेतावणी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आमदार महाले यांच्या सुरक्षेचा आढावा घेत सशस्त्र पोलिस सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

याअंतर्गत, सशस्त्र पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस आणि एस्कॉर्ट वाहन सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

या प्रकरणामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या आरोपीचा तातडीने शोध घेऊन सत्य परिस्थिती उघड करावी, अशी मागणी होत आहे.

धमकीप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांचा संतापधमकी एका विशिष्ट गटाच्या नावाने दिल्याचे पत्रातून स्पष्ट होत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. २१ फेब्रुवारी रोजी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाले यांच्या निवासस्थानापासून पोलिस ठाण्यापर्यंत रॅली काढून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुरक्षाव्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतला.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!आमदार महाले यांच्या सुरक्षेसाठी तगडी व्यवस्था तैनात करण्यात आली असली, तरी अद्याप आरोपींचा कोणताही माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. इतर प्रकरणांत २४ तासांत आरोपींना गजाआड करणारे पोलिस या गंभीर प्रकरणात चार दिवस उलटूनही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत, यावर कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाbuldhanaबुलडाणा