शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

शिवार फेरीतून भटकळांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST

पोफळी येथील मियावाकी प्रकल्पाचे केले कौतुक : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशनचे सीईओ ...

पोफळी येथील मियावाकी प्रकल्पाचे केले कौतुक : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

धामणगाव बढे : पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी मोताळा तालुक्यातील विविध गावांमध्ये २ फेब्रुवारी राेजी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी हाेण्याचे आवाहन केले.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत मोताळा तालुक्यातील अनेक गावांनी चांगली कामगिरी केली. आता पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धेच्या निमित्ताने पुढचे पाऊल टाकले आहे. गावांचा शाश्‍वत विकास ही या स्पर्धेची मूळ संकल्पना आहे. यासाठी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सत्यजित भटकळ यांनी केले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अंतर्गत पोफळी येथे मियावाॅकी जंगल प्रकल्प साकारण्यात आला होता. त्याची पाहणी सत्यजित भटकळ यांनी केली. संपूर्ण विदर्भातील हा एकमेव प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मोताळा तालुक्यातील उर्हा, सिंदखेड, शेलापूर या गावांना त्यांनी भेटी दिल्या. सिंदखेड येथे आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील जनुना, तिघरा, उबाळखेड, दाभा, कोऱ्हाळा बाजार, सिंदखेड येथील जल मित्रांसोबत त्यांनी संवाद साधला. सिंदखेड येथे शिवार फेरी, जलसंधारणाची कामे याविषयी माहिती घेतली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमुळे आनंद, पाणी व आत्मविश्वास मिळाला. ती फक्त सुरुवात होती. अजून पुढे मोठे काम करायचे बाकी आहे. जनसहभाग व जनआंदोलनामुळे शक्य आहे, असे भटकळ यांनी सांगितले. प्रत्येक ठिकाणी गावकऱ्यांनी भटकळ यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सिंदखेड येथील कामाची माहिती प्रवीण कदम यांनी दिली. मोताळा तालुक्यातील २० गावांनी समृद्ध गाव स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. यावेळी पाणी फाऊंडेशनचे खान्देश समन्वयक सुखदेव भुसारी, विदर्भ समन्वयक सुभाष नानवटे, मोताळा तालुका समन्वयक ब्रह्मदेव गिऱ्हे, तांत्रिक समन्वयक सुमित गोरले, प्रभाग समन्वयक सचिन बोरसे, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक संदीप जाधव उपस्थित होते.