शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 10:59 IST

संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गासह तत्सम कारणांनी बाजार समित्यांच्या निवडणुकांना २४ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यामुळे संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्याच्या आत प्रशासकांना या बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे.महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती तथा खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ मधील १५ अ कलमाचा आधार घेत संचालक मंडळांची मुदत संपलेल्या बाजार समित्यांवर प्रशासकांची जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी नियुक्ती केली आहे. यात प्रामुख्याने चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, लोणार, जळगाव जामोद आणि संग्रापूर बाजार समित्यांचा समावेश आहे. स्थानिक सहाय्यक निबंधक हे या बाजार समित्यांचे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान जळगाव जामोद येथील बाजार समितीवर शेगाव येथील सहाय्यक निबंधक बी. एन.कोल्हे तर संग्रामपूर बाजार समितीवर जळगाव जामोद येथील सहाय्यक निबंधक श्रीमती एस. पी. जुमडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चिखलीमध्ये जी. पी. साबळे, मेहकरमध्ये जी. एस. फाटे, देऊळगाव राजात एस. यू. जगदाळे, लोणारमध्ये आर. एल. हिवाळे यांच्याकडे प्रशासकाची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यात येथे निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.निवडणुकीस दिलेली मुदत वाढही संपणारयापूवी २४ जानेवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात आली होती. तीही आता २४ जुलै रोजी संपत आहे. कोरोना ससंर्गाच्या संकटामुळे कायद्यातील १४ (१) कलमचा आधार घेत अपरिहार्य कारणामुळे ही मुदत वाढ देण्यात आली होती. मात्र आता २४ जुलै नंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने कोणती पावले उचलल्या जातात याकडे लक्ष लागून आहे.

सात वर्षापासून रखडल्या निवडणुकाजिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेड राजा आणि मोताळा बाजार समित्यांवरही सध्या प्रशासक कार्यरत असून २००९ ते २०१३ दरम्यान या तिन्ही बाजार समित्यांची निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र मधल्या कालात निवडणुकासंदर्भात बदलेले निर्णय, त्यासाठी निधीची अडचण पाहता या निवडणुका रखडल्या होत्या. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जुना निर्णय बदलण्यात आल्याने या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे आता त्या प्रत्यक्षात कधी होतील, याकडे लक्ष लागून आहे.आणखी तीन बाजार समित्यांची मुदत संपतेयबुलडाणा बाजार समितीची १५ जुलै, खामगाव बाजार समितीची २३ जुलै आणि नांदुरा बाजार समितीची २८ जुलै रोजी मुदत संपत असून या तीन बाजार समित्यांवरही महिना अखेर प्रशासक नियुक्त होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावChikhliचिखली