शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
3
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
4
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
5
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
6
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
7
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
8
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
9
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
10
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
11
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
12
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
13
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
14
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
15
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
16
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
17
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
18
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
19
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
20
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

३१७ बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर

By admin | Updated: April 17, 2017 00:32 IST

अपघातास आमंत्रण : जिल्ह्यातील १६० एसटी बसलाच ‘स्पीड लिमिट’

ब्रह्मानंद जाधव - बुलडाणाहायवेवर सुसाट वेगाने धावणाऱ्या एसटी बसेसचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी परिवहन महामंडळाकडून एसटी बसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते; मात्र जिल्ह्यातील ४७७ एसटी बसेसपैकी केवळ १६० बसेसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले आहे. त्यामुळे ३१७ एसटी बसेस ‘स्पीड लिमिट’च्या बाहेर धावतात. त्यामुळे वेगावर नियंत्रण नसलेल्या बसेस अपघातास आमंत्रण ठरतात. रस्त्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांचे वेगावर नियंत्रण राहत नसल्याने दररोज अपघाताच्या घटना घडतात. वेगावर नियंत्रण नसल्याने होणाऱ्या अपघाताच्या घटनांमध्ये खासगी वाहनेच नाही तर सुरक्षित प्रवासाची सदैव हमी देणाऱ्या एसटी बसही मागे नाहीत. हायवेवर सुसाट धावणाऱ्या एसटी बसेसला वेगमर्यादा नसल्याने एसटी बसेसच्या अपघाताच्या घटना घडतात. त्यासाठी आरटीओने शहरात आणि हायवेवर सुरक्षित वेगमर्यादा ठरवून दिली आहे. तसेच या वाहनांना वेग मर्यादा न ओलांडण्याची सक्ती केली आहे; मात्र अनेक वाहनचालक नियम पाळत नाहीत. एसटी बसने वेग मर्यादेचा नियम पाळावा याकरिता एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ची यंत्रणा बसविण्यात येते. जिल्ह्यात सात ठिकाणी एसटी बसचे आगार आहे. त्यामध्ये बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद यांचा समावेश आहे. या सात आगारांतर्गत ४७७ एसटी बसेस शहरासह ग्रामीण भागात धावतात. या बसेसच्या भरवशावर दररोज हजारो प्रवासी निश्चिंत होऊन प्रवास करतात; मात्र यातील अर्ध्या बसेस ह्या जुनाट इंजीनवर धावतात. तसेच एसटी बसेसचा वेग नियंत्रणात रहावा, यासाठी बसला ‘स्पीड लिमिट’ बसविणे गरजेचे असताना जिल्ह्यातील ४७७ बसेसपैकी केवळ १६० बसलाच ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आले असून, ३१७ एसटी बसेसला ‘स्पीड लिमिट’ बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात धावणाऱ्या ३१७ बसेसचे वेगावर नियंत्रण दिसून येत नाही. वर्षातून एकदाच होते एसटीची तपासणीसर्व एसटी बसेसचे इंडिकेटर्स, हेडलाइट चालू आहेत किंवा नाही याची नियमित तपासणी होत नाही. प्रत्येक महिन्याला काही बसेस प्रादेशिक परिवहन विभागातून तपासणी करणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यातील एसटी बसेस वर्षभरानंतर एकदाच आरटीओकडे तपासणीसाठी पाठवल्या जातात. त्यामुळे बसमध्ये काही त्रुटी आढळल्यास येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये दुरुस्त करून पुन्हा बस सोडली जाते. यातील बहुतांश बसेस तर तात्पुरत्या दुरुस्तीखालीच सुसाट धावत आहेत.