शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंद नदीत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: June 26, 2016 00:25 IST

तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे.

साकोली तालुक्यात पाणीटंचाई : नागरिकांसह जनावरांनाही फटकासंजय साठवणे साकोली तालुक्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे पडल्याने नागरीकांसह जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. चुलबंद नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजनाही ठप्प असून निम्न चुलबंद प्रकल्प शोभेची वस्तु ठरला आहे.अत्यल्प पावसामुळे चुलबंदच्या पात्रातील पाणी आटले. त्यामुळे परिसरात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. परिसरातील बहुतांश भागातील नळयोजना या विहीरीवर आहेत. या विहिरी ५० ते ६० फुट खोल आहेत. मात्र गावात शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेल यापेक्षाही खोल आहेत. त्यामुळे नळयोजनेच्या विहिरी खोल पडल्या. परिणामी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही विदारक स्थिती तालुक्याची आहे.जीवन प्राधिकरणाची योजना ठप्पसाकोली व लाखनी तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणातर्फे साकोली येथे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली. या पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी चुलबंद प्रकल्पातून घेण्यात येणार होते. मात्र प्रकल्पाचे काम रखडल्याने व पाणीसाठा अत्यल्प असल्याने ही योजना पुर्णपणे ठप्प पडली आहे.लोकप्रतिनिधींची उदासिनतानिम्न चुलबंद प्रकल्पाचे काम मागील १५ वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरलेला हा प्रकल्प लवकर पुर्ण होईल, शेतीला सिंचनाची सोय होईल, या आशेवर शेतकरी असला तरी दिवास्वप्न ठरलेल्या या प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष आहे. निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम कासवगतीने होत आहे.