शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

जांभोऱ्यातील पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: September 18, 2014 23:30 IST

जांभोरा पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंद आहे. नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असताना ग्रामपंचायत पदाधिकारी बाहेरगावी गेले असल्याचे सांगितले जाते. ग्रामविकास अधिकारी इतर

युवराज गोमासे - करडी (पालोरा) जांभोरा पाणी पुरवठा योजना १५ दिवसांपासून बंद आहे. नागरिक शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित असताना ग्रामपंचायत पदाधिकारी बाहेरगावी गेले असल्याचे सांगितले जाते. ग्रामविकास अधिकारी इतर गावांचा प्रभार असल्याचे कारण देत दुर्लक्ष करीत असतात. त्यामुळे पंपहाऊस मधील इंजीनमधील बिघाड दुरुस्तीला विलंब होत असून नागरिक पाण्यासाठी भटकत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. जांभोरा पाणी पुरवठा योजनेला वैनगंगा नदीवर पंपहाऊस बसविण्यात आला आहे. ७ ते ८ कि.मी. अंतरावरून पाईप लाईनद्वारे गावकऱ्यांना पाण्याचा पुरवठा केला जातो. पंपहाऊसमधील इंजीनमध्ये बिघाड आल्याने सध्या स्थितीत संपूर्ण योजना बंद पडली आहे. पाणीपुरवठा १५ दिवसांपासून ठप्प आहे. मात्र इंजीन दुरुस्तीचे सौजन्य दाखविले नाही. सरपंच कल्पना गोबाडे मुलांचे आरोग्य बिघडल्याने गावाबाहेर आहेत. उपसरपंच ताराचंद समरीत सुद्धा गावात नाहीत. ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी बाहेर आहेत. अशावेळी योजना चालविण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी सानप यांचेकडे येते. मात्र त्यांनी सुद्धा दुर्लक्ष केल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. करडी व पांजरा बोरी गावाचा प्रभार सानप यांच्याकडे असून प्रभारी गावातील कामांचा ताण वाढल्याने वेळ मिळत नसल्याचे कारण त्या पुढे करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांना नियमित शुद्ध पिण्याच्या पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. प्रशासनामध्ये सरपंच, उपसरपंच, सचिव, सर्व सदस्यांचा समावेश होतो. गावात १५ दिवसापासून पिण्याच् या पाण्यासाठी हाहाकार उडाला असताना तातडीचा निर्णय म्हणून ग्रामविकास अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडायला हवी होती. मात्र त्यांनी त्यासाठी निर्णय क्षमता दाखविली नाही. परिणामी योजना बंद राहिली असा आरोप आहे.नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी कराचा भरणा करतात. एखादवेळी कराचा भरणा करण्यास उशीर झाल्यास पाण्याचा पुरवठा खंडीत किंवा बंद करण्याची भाषा वापरली जाते. मग नियमित पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची नाही काय? निव्वळ अधिकाराचा दंभ मिरविण्यासाठीच पदाधिकारी आहेत काय? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. नागरिकांचे अच्छे दिन येण्यासाठी तातडीने उपाययोजना करून इंजीनमधील बिघाड दुरुस्त करण्यात यावा, पाण्याचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.योजना १५ दिवसापासून बंद असल्याच्या मुद्यावर सरपंच कल्पना गोबाडे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या मुलांची प्रकृती बिघडल्याने मी गावाबाहेर आहे. गावी आल्यानंतर तातडीने निर्णय घेतला जाईल, मात्र त्या अगदोरच आपण इंजीन दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. पाणी पुरवठा लवकरच नियमित केला जाईल.