शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड

By admin | Updated: November 1, 2014 22:48 IST

सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी सुरू आहे. १५ दिवसांनी जड धानही कापणीला येणार आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी डोक्यावरच्या कर्जफेडीसाठी धान

भंडारा : सध्या जिल्ह्यात हलक्या धानाची कापणी सुरू आहे. १५ दिवसांनी जड धानही कापणीला येणार आहे. त्यामुळे धान खरेदीसाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी डोक्यावरच्या कर्जफेडीसाठी धान विक्रीला काढावे आणि दलालांनी आपली टोपी सावरावी, अशी स्थिती नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे नुकत्याच धानाच्या खरेदीसाठी व्यापारी टपून बसले आहेत.यावर्षी नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांनी चांगलीच फजिती केली. धान नर्सरीच्या पेरणीपासून तर कापणीपर्यंत शेतकऱ्यांचे आर्थिक पात्र रिकामे झाले असले; तरी आत्मविश्वासाने परिस्थितीशी सामना केला आहे. परंतु, आता मात्र, धानाच्या विक्रीसाठी दलालाच्या दावणीला धानाची गाठोडी बांधण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांचाही धुमाकूळ सुरू झाला आहे. यावर्षी धानाला योग्य भाव मिळाला नाही, तर शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. व्यापाऱ्यांच्या आणि दलालांच्या बळजबरीने शेतकऱ्यांचे नुकसान होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांनी जीवाचे रान करू न धानाची लागवड केली. काहींना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे परिणामी खर्च आर्थिक बळ पुन्हा मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरु आहे. अधिक प्रमाणात धानाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांकडे दलालांच्या फेरफटका सुरू झाल्या आहेत. यामुळे धान खरेदीसाठी व्यावसायिक वर्गाचे लक्ष लागले आहे. धानाची मळणी होताच व्यापारी धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना निरोप देत आहेत. यावर्षी धानविक्री सोबतच खरेदी मोठया प्रमाणात होणार असल्याचे दिसून येत आहे. काहींनी फायदा तर काहींना तोटा अशी परिस्थिती यावर्षी शेतकऱ्यांच्या वाट्याला येणार आहे. त्यातही काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे धानावर अयोग्य परिणाम होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी पुन्हा नैसर्गिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतावरच्या फेऱ्या वाढत्या असून, त्याच्यात चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. अकाली पावसाने हजेरी लावल्याने धानपिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना यावर्षी चांगलीच कंबर कसावी लागल्याने आर्थिक बोाजही सहन करावा लागला आहे. मात्र, कर्जफेडीसाठी धानविक्री महत्वाची असून योग्य भावाची आशा शेतकऱ्यांची पदरात आली आहे. (नगर प्रतिनिधी)