शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

टंकलेखन संस्था चालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

संस्था मान्यता, नूतनीकरण तसेच अभासक्रमाच्या परीक्षेसाठी दिले जाते. मात्र शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन तसेच संगणक टंकलेखन संस्थांना कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा संस्थेत काम करणाऱ्या प्राचार्य तसेच निर्देशकाना मानधनही शासनाकडून दिले जात नसून विद्यार्थ्यांकडून येणाºया फिस मधूनच संस्था चालक खर्च भागवतात.

ठळक मुद्देशासनाकडे केली मागणी । आर्थिक मदत देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : संपूर्ण महाराष्ट्रातील शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन व संगणक टंकलेखन संस्था २२ मार्च पासून पुर्णत: बंद असल्यामुळे संस्था चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे विद्दुत देयक, रूम भाडे, कर्मचारी पगार देण्याकरिता शासनाच्या आर्थिक मदतीची गरज असून शासनाने टंकलेखन संस्थांना आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी संस्था चालकांकडून होत आहे.
महाराष्ट्रात एकूण ४२५० टंकलेखन, लघुलेखन व संगणक टंकलेखन संस्था अस्तित्वात असून या संस्थेच्या माध्यमातून शासनाला वषार्काठी करोडो रुपये महसूल मिळतो. संस्था मान्यता, नूतनीकरण तसेच अभासक्रमाच्या परीक्षेसाठी दिले जाते. मात्र शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन तसेच संगणक टंकलेखन संस्थांना कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा संस्थेत काम करणाऱ्या प्राचार्य तसेच निर्देशकाना मानधनही शासनाकडून दिले जात नसून विद्यार्थ्यांकडून येणाºया फिस मधूनच संस्था चालक खर्च भागवतात.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्याकरिता शासनाने २२ मार्चपासून देशव्यापी बंद केला होता. त्यामुळे टंकलेखन संस्थावर अवलंबून असलेल्या संस्था चालकांवर उपासमारीची वेळ आली असून कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, भाड्याने असलेल्या दुकानाचा किराया कुठून भरावा, विद्युत देयके कसे भरावे, कर्मचाऱ्यांना मानधन कुठून द्यावे, अश्या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. आजही विद्यार्थी टंकलेखन संस्था कधी सुरू होणार अशी विचारणा करीत आहेत.

शासनाला निवेदन
संकटात सापडलेल्या या टंकलेखन, लघुलेखन, संगणक टंकलेखन संस्थांना शासनाने आर्थिक पॅकेज घोषित करावा, संस्था चालकांना मानधन देण्यात यावा, विद्युत बिल माफ करण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन संस्था चालकाकडून निवासी जिल्हाधिकारी अभिमन्यू बोदवड यांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक