शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली.

ठळक मुद्देपेरणीला येणार वेग : घोरपड येथे वीज कोसळून शेतकरी ठार, तासभर पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भात मान्सून सक्रिर्य झाल्यानंतर सोमवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या या पावसाने शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे. भंडारा शहरातही जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी शिरले होते. तर मोहाडी तालुक्यातील घोरपड येथे वीज कोसळून एक शेतकरी ठार झाला.
रोहीणी नक्षत्रापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. मृग नक्षत्रातही जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. मात्र पेरणी योग्य पाऊस झाला नव्हता. अशातच दोन दिवसांपूर्वी विदर्भात मान्सून सक्रिय झाला. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरीही लावली. मात्र सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर सारखा पाऊस कोसळत होता.
भंडारा शहरात तासभर झालेल्या या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले. रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याचे दृष्य दिसत होते. या पावसाने जनजीवन प्रभावित झाले होते. शहरात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. मोहाडी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. आंधळगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार घोरपड येथील शेतकरी दिलीप नागोराव पुडके वीज कोसळून ठार झाले. ते आपल्या शेतात पºहाटी लावण्याचे काम करीत होते.
पवनी येथे दुपारी २.४५ वाजतापासून वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोंढा परिसरात ३.५० वाजतापासून पावसाचा सरी सुरु झाल्या. लाखनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून पालांदूर परिसरात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली.
तुमसर शहरासह तालुक्यातील पवनारा, खापा, मोहाडी तालुक्यातील जांब लोहारा, करडी पालोरा, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, लाखनी यासह साकोली शहरासह एकोडी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.

पऱ्हे भरणीला येणार वेग
धान पिकासाठी सुरुवातीला पर्ह्यासाठी नर्सरी टाकावी लागते. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नर्सरी तयार केली आहे. मात्र दमदार पाऊस झाल्याशिवाय पऱ्हे टाकू नये असे कृषी विभागाने सुचविले होते. मात्र ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्यांनी पºहे भरणीला सुरुवात केली होती. मात्र आता दमदार पाऊस झाल्याने पºहे भरणीला वेग येणार आहे.
दोन दिवसात झालेल्या पऱ्हेटाकणीला सोमवारच्या पावसाने फायदा होणार आहे. पऱ्हे टाकणे निश्चितच साधणार आहे. अनेक शेतकरी आता जोमाने कामाला लागणार आहे. जिल्ह्यातील एक ९४ हजार हेक्टरवर धान पिकाची लागवड होणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले असून शेतकरी धान बियाण्यांची चाचपणी करीत आहे. कोरोना संकटामुळे शेतकरी धास्तावला असून कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे व खते पोहोचवित आहे.

टॅग्स :Rainपाऊस