शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

भर पावसात पोलीस पोहचले, खड्डा खोदला अन् पोत्यात निघाले मृत श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 5:00 AM

भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाजे, हवालदार काटेखाये, खेर, चकोले घटनास्थळाकडे निघाले. शहरात धो-धो पाऊस सुरु होता.

ठळक मुद्देभंडारातील बैल बाजारानजीकचा प्रकार । पोलिसांची तासभर दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुपारी २ वाजताची वेळ. पोलीस ठाण्यातील फोन खणाणला. पलिकडून उत्तर आले बैलबाजार परिसरात कुणाचा तरी मृतदेह पुरलेला आहे. पोलिसांचे कान टवकारले. तात्काळ पथक रवाना झाले. भर पावसात खड्डा खोदणे सुरु झाले. आतमध्ये मोठे पोते दिसू लागले. नक्कीच कुणाचा तरी मृतदेह असावा या निष्कर्षाप्रत पोलिसही पोहचले. परिसरातील नागरिकांची उत्कंठाही शिगेला पोहचली. कुणाचा मृतदेह असेल, कुणी खून तर केला नसेल ना अशी चर्चा सुरु झाली. मात्र काही वेळातच पोत्याचे बांधलेले तोंड सोडले आणि त्यातून निघाले मृत श्वान. या प्रकारात पोलिसांची मात्र भर पावसात चांगलीच दमछाक झाली.भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाजे, हवालदार काटेखाये, खेर, चकोले घटनास्थळाकडे निघाले. शहरात धो-धो पाऊस सुरु होता. भर पावसात पोलीस पथक बैलबाजार परिसरात पोहचले. महसूलचे नायब तहसीलदारही दाखल झाले. खड्डा खोदण्यास प्रारंभ झाला. परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली. शंकांचे पेव फुटले. पोलीस पथक खड्डा खोदत असताना मोठे पोते खड्ड्यात दिसून आले. नक्कीच काहीतरी काळेबेरे असावे असा त्यांचा कयास होता. काही वेळात पोते वर काढण्यात आले. त्या पोत्याचे तोंड सोडले आणि पाहते तर काय? आतमध्ये एक मृत श्वान.सदर श्वान कुणाचा तरी पाळीव असावा. घरमालकाचे त्याच्यावर जीवापाड प्रेम असावे. वृद्धापकाळाने म्हणा की आजाराने श्वान मृत पावले असेल. आपल्या लाडक्या श्वानाचा मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले असावे. त्यातूनच एका मोठ्या पोत्यात श्वानाला बांधून आणि खड्डा खोदून त्यात पुरले असावे. हा प्रकार लक्षात आला आणि पोलिसांना माहिती दिली. अन् पुढे घडले नाट्य.

टॅग्स :Policeपोलिस