शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी जमिनीला भेगा; पऱ्हे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यानतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. परंतु आठवड्यापासून प्रचंड शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. दोन चार दिवसात पाऊन न झाल्यास केलेली मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांत आहे.



पाऊस बेपत्ता : करडी परिसरातील ५,४६४ हेक्टर क्षेत्रातील पीके संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : कोरडवाहू करडी परिसरात सुमारे ५,४६४ हेक्टर आर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. सुमारे १९७ हेक्टर क्षेत्रात धुऱ्यावर तूर पिकाची लागवड करण्यात आली. वैनगंगा नदीकाठावरील सिंचनाची सोय असलेल्या भागात सुमारे ५० हेक्टर क्षेत्रात रोवण्या आटोपल्या. परंतु आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणीला भेगा पडल्या असून पऱ्हे करपू लागली आहेत.
कोरडवाहू असलेल्या करडी परिसरातील २५ गावांवर निसर्गाचा प्रकोप वर्षानुवर्षे सुरू आहे. चौहूबाजुला जंगल असताना भुगर्भात पाण्याचा पुरेसा साठा नाही. तलावांत अतिक्रमणे व उथळपणांमुळे जलसाठा राहत नाही.
विहिर खोदली तरी खरीपातही पाणी पुरत नाही. अशा बिकट परिस्थितीतही निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकरी आजही चांगल्या उत्पन्नाची आशा धरून आहे.
यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यानतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. परंतु आठवड्यापासून प्रचंड शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. दोन चार दिवसात पाऊन न झाल्यास केलेली मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांत आहे.

पीक कर्जासाठी धडपड
करडी परिसरात पीक कर्जासाठी बँक व सोसायट्यांच्या चकरा शेतकºयांनी वाढविल्या आहेत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात माघारल्या आहेत. विविध बँकांच्या कर्ज नसल्याच्या दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना भटकावे लागत आहे. सहकार क्षेत्रातील बँका वगळता राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या नावाने बोटा मोडीत आहेत.
गरजेनुसार खताचा पुरवठा करण्याची मागणी
२४ ते २६ जून या कालावधीत करडी परिसरातील १० कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये करडी चार, मुंढरी चार तर प्रत्येकी एक पालोरा व मोहगाव कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे. कृषी विभागाने यावर वेळीच उपाय योजना करून शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती