शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळीच्या पुनर्बांधणीची गरज

By admin | Updated: December 20, 2015 00:28 IST

भारतीय राज्यघटना अंमलात येवून ६५ वर्षे झाली तरी आजही देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विषमता दिसून येते.

भंडाऱ्यात सामाजिक न्याय सभा सुखदेव थोरात यांचे प्रतिपादनभंडारा : भारतीय राज्यघटना अंमलात येवून ६५ वर्षे झाली तरी आजही देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विषमता दिसून येते. समकाळात तर सामाजिक स्वातंत्र्याचे, न्यायाचे, अभिव्यक्तीचे प्रश्न अधिकच बिकट झाले आहेत. या दृष्टीने या सर्व समाज घटकाच्या विकासाकरिता संघटितपणे विचार, चिंतन व समूह चर्चा करून एक सखोल कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याची व त्याकरिता आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे, असे मौलिक विचार विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती भंडारा आणि असोसिएशन फॉर सोशल जस्टीस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक एम्पावरमेंट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित सामाजिक न्याय सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत माजी प्राचार्य भगवान सुखदेवे होते.थोरात म्हणाले, समानता, सामाजिक न्यायाचा गाभा आहे. जाती व्यवस्था केवळ सामाजिक क्षेत्रातच नाही तर धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व रोजगार क्षेत्रातही आहे. अस्पृश्य दलितांना शिक्षण, जमिन, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रातील अधिकार नाकारण्यात आले होते. नाकारलेल्या अधिकाराची नुकसान भरपाई म्हणजे आरक्षण होय. स्वातंत्र्यानंतर सामाजिक न्यायाचा प्रश्न नव्या राष्ट्र उभारणीच्या संविधानिक चळवळीतून पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज देशात जीवनातील सर्व प्रकारच्या विषमता, आवाहन म्हणून उभ्या आहेत. या विषमता नष्ट करण्यासाठी प्रेरित झालेल्या चळवळींना भावनात्मक आंदोलनातच गुंतवून ठेवण्यास भाग पाडणारे षडयंत्र प्रस्थापित व प्रतिगामी व्यवस्थेकडून सातत्याने रचले जात आहेत. याकरिता दलितांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.प्रा. डॉ. गौतम कांबळे व डॉ. पारीश भगत यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. सभाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी देशातील वर्तमान परिस्थिती व दलित चळवळीची चिकित्सा करून चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रलोभनाला बळी न पडता चळवळीचे उद्दिष्ट समजून कार्य करावे, असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. के.एल. देशपांडे व इंजि. रूपचंद रामटेके यांनी भंडारा नगरीच्या वतीने डॉ. सुखदेवे थोरात यांचा शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. मंचावर डी.एफ. कोचे, डॉ. जी. भैय्यालाल व संयोजक अमृत बन्सोड यांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अनिल नितनवरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. उमेश बन्सोड, प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी केले तर आभार डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाकरिता डॉ. अनिल नितनवरे अमृत बन्सोड, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. भय्यालाल, गुलशन गजभिये, संजय बन्सोड, प्रा. के.एल. देशपांडे, इंजि. रूपचंद रामटेके, आदिनाथ नागदेवे, असित बागडे, धर्मदीप कांबळे, अरुण अंबादे, उपेन्द्र कांबळे, माणिकराव रामटेके, भाविका उके, एस.एस. साठवणे, माया उके, ए.पी. गोडबोले, व्ही.डी. मेश्राम, एम.डी. गेडाम, आनंद गजभिये, करण रामटेके, डॉ. सलील बोरकर, डॉ. डी.आय. शहारे इत्यादींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)