शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

केसलापुरीत समस्यांचा अंबार

By admin | Updated: October 3, 2015 00:40 IST

पवनी तालुक्यातील अड्याळहून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलव्याप्त गाव असलेल्या केसलापुरी येथे मुलभूत सोइर ...

विशाल रणदिवे अड्याळपवनी तालुक्यातील अड्याळहून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलव्याप्त गाव असलेल्या केसलापुरी येथे मुलभूत सोइर सुविधांचा वाणवा आहे. ३००लोकवस्तीचे गाव असलेल्या केसलापुरीत विकासाची गंगा अजुनही पुर्णत: पोहोचलेली नाही. विशेष म्हणजे वनविभागातर्फे या गावात कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी जंगलात गुऱ्हे चराई बंदी करण्यात आली आहे. केसलापुरी गावात २ विहीर आहेत. त्यापैकी एक भूकंपाच्या झटक्याने निकामी तर एक पिण्यायोग्य पाणी नसतानाही नाईलाजास्तव तेच पाणी प्यावे लागत आहे. पथदिवे नाही. गावात चार बोअरवेल असून त्या निकामी आहेत. स्मशानभूमित शेड नसून तिथेही पाण्याची व्यवस्था नाही. एकंदरीत पावलो पावली या ग्रामस्थांच्या नशिबी समस्यांची रांगच उभी आहे.तीन सप्टेंबर रोजी गावात वनविभागातर्फे गॅस कनेक्शन ग्रामस्थांना देण्यात आले. त्याप्रसंगी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या वनविभागाचे अधिकारी वरखडे, वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाठक, क्षेत्र सहायक बागडे, मुनिर शेख, अतुल मुलकलवार यांनी कार्यक्रमात ३० सप्टेंबर पर्यंत गावातील ३६ महिला कामगारांची मजुरी देण्यात येईल म्हणून घोषणा केली होती. येथील ३६ महिला रोपवन कामगारांना ३५ दिवसांची केलेल्या कामाची मजुरी मागायला भंडारा तर दोनदा अड्याळ वनपरिक्षेत्र कार्यालयात चकरा माराव्या लागल्या तरीही मजुरी मिळालेली नाही. गावातील विहिरीची पाहणी करून पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आल्याने उपस्थित ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमही थाटात पारी पडला. परंतु एक महिना लोटूनही दिलेल्या आश्वासनाची कुणालाही आठवण झाली नाही. ना पाण्याची व्यवस्था झाली, ना रोपवाटिकेतील महिला मजुरांना हक्काची मजुरी मिळाली. त्यांनी आपली समस्या घेवून जायचे तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे. समस्या सोडविणारे लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनीच आश्वासन देवून सुद्धा महिन्याभरात समस्या सुटत नसतील तर विश्वास ठेवायचा कुणावर, असे येथील नागरिकांनी बोलुन दाखविले. समस्यांबाबतीत पाठपुरावा केला तर काही प्रमाणात नक्कीच समस्या सुटतील. मात्र याकडे गांर्भियाने लक्ष देणे गरजेचे आहे. केसलापुरी वासीयांच्या समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सरकारी अनुदान न मिळाल्याने यांना बोलल्या प्रमाणे मजुरी मिळाली नाही परंतु २० आॅक्टोबरला यांना ही थकबाकी मजुरीची रक्कम लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.-महेश पाठकवनपरिक्षेत्राधिकारी,अड्याळ