शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी: दमदार पावसाच्या हजेरीने चौरास पट्टातील उन्हाळी धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात काही प्रमाणात मळणी करताना तर काही कापणी होताना शेकडो क्विंटल धानाच्या कडपा पाण्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.
दरवर्षीच ऐन पीक हाती येत असताना निसर्गाची अवकृपा होऊन शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. झालेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना पिकासाठी केलेला व्यवहार कसा सोडवायचा, हा चिंतनीय प्रश्न असल्यामुळे समस्यांचा डोंगर कोसळण्याचे चित्र निर्माण होत आहे.
आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेने दिलासा मिळाला असला तरी शेतातून मिळणाºया उत्पन्नाने अपेक्षित रोजनिशी लागणारा कौटुंबिक अत्यावश्यक खर्च सांभाळण्याची स्थिती नसतांना उन्हाळी पिकांचे होणारे नुकसान यात भर पाडणारी आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतशिवारात झालेल्या दमदार पावसाने धान पिकांची भयानक नुकसान झाले आहे. काहींची पिके शेतात कापणीसाठी उभी आहेत काहींची कापणी होऊन शेतात कडपा ओलेचिंब अवस्थेत पडल्या आहेत. काहींचे धान मळणी करताना पावसात सापडले आहेत. एरवी देशाचा पोषणकर्ता असणाºया शेतकºयांचे हाल निसर्गाच्या झालेल्या अवकृपेमुळे बेहाल होतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, बँका व खासगी कजार्तून मुक्तता आदी प्रश्न आवासून उभे आहेत.
तालुक्यातील उन्हाळी पीक क्षेत्राच्या गावाचे भ्रमण केले असता अनेक गावात शेतकरी मळणी केल्यानंतर पाण्यात भिजलेले धान अंगणात वाळवितांना दिसले, तर काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीला शेतावर नेऊन होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली. याप्रसंगी संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांनी शासनाकडून शेतीचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक मदत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यरंभ करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक