शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निकांडातील बालकांच्या कुटुंबीयांना थेट बॅंकेत आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 06:12 IST

पंतप्रधान व राज्यपालांची मदत थेट बॅंकेत

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत दहा लाख रुपयांची मदत घोषित झाली आहे. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये, पंतप्रधान सहाय्यता निधी आणि राज्यपाल स्वेच्छानिधीतून प्रत्येकी दोन लाख तर शिवसेनेच्यावतीने प्रत्येकी एक लाखाची मदत घोषित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी धनादेशाचे वाटप घटनेच्या दिवशीच करण्यात आले. तर पंतप्रधान व राज्यपालांची मदत थेट संबंधित परिवाराच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन धनादेश देण्यात आले आहेत.

भंडारा दौऱ्यावर बुधवारी आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपयांची मदत घोषित केली. पंतप्रधान व राज्यपालांनी घोषित केलेली ही मदत संबंधितांच्या बँक खात्यात वळती केली जाणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बुधवारी भंडाऱ्याला आले होते. त्यांनी शिवसेनेच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत घोषित केली होती. या मदतीचे वितरण संबंधित कुटुंबाच्या घरी जाऊन स्थानिक शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी करण्यात आले.ऊर्जामंत्र्यांकडून  पाहणीभंडारा : दहा बालकांचा जीव जाणे ही गंभीर बाब आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी वीज अभियंत्यांनी सविस्तर माहिती घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. शुक्रवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणीदरम्यान ते बोलत होते. 

'त्या' अनाथ बालकाची मदत कुणालाअग्निकांडात लाखनी येथे बेवारस आढळलेल्या पाच दिवसाच्या चिमुकल्याचाही करुण अंत झाला होता. शासनाने मृत्युमुखी पडलेल्या दहा बालकांच्या पालकांना मदतीची घोषणा केली. त्यापैकी ९ कुटुंबांना मदत देण्यात आली. परंतु अनाथ बालकाची मदत कुणाला द्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :fireआगBhandara Fireभंडारा आग