शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान किसान सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

अनेक गावातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. याला कारणीभूत तलाठी व मंडळ अधिकारी असून योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी सुरु करण्यात आली. मात्र या योजनेला वर्षभराचा कार्यकाळ पुर्ण होत असला तरी भंडारा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाही. याला कारणीभूत तलाठी व मंडळ अधिकारी असून योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखा भंडाराच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनानुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम अद्यापपर्यंत बँक खात्यात जमा न झाल्यामुळे तहसील कार्यालयात तालुक्यातील शेतकरी जाऊन चौकशी करीत आहेत. मात्र कागदपत्रांची तपासणी केली असता सर्व बरोबर दिसत नाही. त्यामुळे रक्कम मिळण्यास अडचण का होतो याचा शोध घेतला असता अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असल्याचे स्पष्ट दिसते. अनेकदा माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
योजनेपासून वंचित शेतकºयांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात यावा, चुक असलेली यादी दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांना तहसीलमध्ये ये-जा करणे परवडत नाही. शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक त्रास होत असल्याने योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, योजनेच्या लाभापासून काही शेतकऱ्यांची नावे सुटलेली आहेत. त्यांच्या नावाची नोंदणी करण्यात यावी अशी मागणी समितीने निवेदनातून केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फायदयाची असली तरी अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे.
शिष्टमंडळात अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांच्यासह मनोज गिऱ्हेपुंजे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :Socialसामाजिक