शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पडल्या भेगा, बळीराजा चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:01 IST

गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्देढग जमतात पण पाऊस बरसत नाही : नेरला उपसा सिंचन ठरणार पर्याय, पाणी सोडण्याची गरज

विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : गत तीन आठवड्यांपासून पवनी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली नसतानाही अड्याळसह परिसरातील गावांना नेरला उपसा सिंचन संजीवनी ठरले. मात्र प्रकल्पाच्या पाण्यावर रोवणी झाली असली तरी आता शेतात भेगा दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नेरला उपसा सिंचन पर्याय ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
एकट्या अड्याळ आणि परिसरात पाण्याअभावी अजूनही रोवणी खोळंबलेली आहे. कुठे रोवणी करायला पाणी नाही तर कुठे भातरोप जगविण्यासाठी शेतकरी धडपडत आहे.
ज्यांच्या शेतात रोवणी झाली त्या जमिनीत भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून विशेषत: सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात पण बरसत नाही अशी स्थिती आहे. दुसरीकडे उन्ह - सावलीच्या खेळात उकाड्याचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
नेरला उपसा सिंचन योजनेंतर्गत अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी नियोजन करीत असले तरी आताही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकारी अभियंता अनिल परखडे, सहाय्यक उपविभागीय अभियंता अमोल वैद्य, अजय कावळे, प्रशांत येळणे, सुनील भुरे व त्यांची चमू या कामात व्यस्त दिसून येत आहे.
उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले असले तरी काही शेतकरी इंजीनद्वारे पऱ्ह्यांना पाणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

कोरोना संकटात पाऊसही झाला लॉकडाऊन
खापा : जिल्हा तलावांचा म्हणून ओळखला जात असला तरी बहुतांश शेतकऱ्याची मदार नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहे. खापासह अन्य परिसरात गत आठवड्याभरापासून पाऊस न बरसल्याने वरुण राजाही लॉकडाऊन झाला काय अशी चर्चा आहे. दरम्यान बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला प्रारंभ केला होता. पेरणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे पऱ्हेही आले. मात्र त्या दरम्यान अधून मधून पावसाच्या सरी कोसळल्यामुळे या पऱ्ह्यांना जीवनदान मिळाले होते.
अवकाळी संकटाचा सामना करीत असताना पुन्हा एकदा पावसाने पाठ फिरविली आहे. दहा दिवसांपासून पाऊस न बरसल्याने पिके करपू लागली आहेत. पऱ्हे तांबूस व पिवळे दिसू लागले आहेत. बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची पुन्हा एकदा गरज झाली आहे. नाहीतर शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी आर्थिक टंचाईलाही त्यांना सामोरे जावे लागेल.

दमदार पावसाची प्रतीक्षा
रोवणीनंतर पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसावा अशी शेतकऱ्यांची उमेद होती. मात्र आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही पाऊस बरसलेला नाही. एकट्या उपसा सिंचनच्या भरवशावर किती दिवस धान पीक टिकवून ठेवायचे असा विचारही बळीराजा करीत आहेत. परिसरातील शेतकºयांना पुन्हा एकदा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस