शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

दोन तालुक्यात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे२४ तासात ५०.१ मिमी पाऊस : १५ दिवसात १७७ मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मान्सून सक्रीय झाल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला असून २४ तासात जिल्ह्यात ५०.१ मिमी पावसाची नोंद झाली. पवनी आणि लाखनी या दोन तालुक्यांसह सात मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकरी सुखावला असून पऱ्हे टाकण्याच्या कामाला वेग आला आहे.
सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर तब्बल तासभर दमदार पाऊस कोसळला. पवनी आणि लाखनी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पवनीमध्ये १३०.४ मिमी पावसाची नोंद झाली असून १ ते १६ जूनपर्यंत २२५.७ मिमी पाऊस कोसळला आहे. तर लाखनी तालुक्यात ७०.८ मिमी पाऊस कोसळला असून १५ दिवसात २४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यात गत २४ तासात ४७ मिमी, मोहाडी १५.१ मिमी, तुमसर २३.३ मिमी, साकोली ४०.२ मिमी, लाखांदूर २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात ८५ मिमी, बेला ७२ मिमी, पवनी तालुक्याच्या आमगावमध्ये ११२.३ मिमी, साकोलीच्या एकोडी मंडळात ७२ मिमी, लाखांदूर तालुक्याच्या बारव्हा मंडळात ६८.८ मिमी,मासळ ७८.४ मिमी, लाखनी तालुक्याच्या पोहरा मंडळात १०४.२ मिमी पावसाची नोंद झाली असून या मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला असून शेतात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. पºहे टाकणी सुरु झाली असून आणखी दमदार पाऊस झाल्यानंतर आगामी काळात रोवणीला सुरुवात होणार आहे. मृग नक्षत्रातील पावसाने शेतकरी सुखावला असला तरी आणखी दमदार पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

पऱ्हे टाकण्याच्या कामाला आला वेग
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर मंगळवारी शेत शिवारात शेतकरी व शेतमजूरांची लगबग दिसत होती. पºहे टाकण्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वदूर दिसत होते. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यापुर्वीच पऱ्हे टाकले होते. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला आणि शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाला. गत काही वर्षांपासून पाऊस दगा देत असल्याने शेतकरी यावर्षीही विचारपूर्वक रोवणी करण्याच्या मानसिकतेत आहेत. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी रोवणी करणार आहे. यावर्षी एक लाख ९४ हजार हेक्टरवर धानाची लागवड होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस