शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा चुराडा तरीही पाण्यासाठी वणवण ! पाणीपुरवठा योजनांचे वास्तव समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 19:32 IST

Bhandara : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाकडून पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे. तुमसर तालुक्यातील चुल्हाड, गुढरी तर अड्याळ नजीकच्या सानगाव-देवरी येथे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने लाखनी तालुक्यातील देवरी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या सानगाव येथे पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २०२२ मध्ये सरु यालेल्या 'हर घर जल' योजनेतून काही दिवस पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. परंतु नंतर विविध अडचणी निर्माण झाल्या. टाक्यांची गुणवत्ता खराब असल्याने प्लास्टिकच्या दोन टाक्या अल्पावधीतच फुटल्या. सुमारे २५० लोकवस्ती असलेल्या या गावात पाण्यासाठी अक्षरशः हाहाकार उडाला आहे. 

आठ महिन्यांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी ग्रामस्थांना विहिरीतून किंवा बोरिंगद्वारे पाणी भरावे लागत आहे. विशेषतः महिलांना यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठीही पाण्याची कमतरता जाणतत आहे आगामी काळात गावात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्नही ग्रामस्थांसमोर उभा राहिला आहे. पाणीटंचाई दूर करण्याची मागणी अर्चना त्रिपाठीसह शामकला निकुरे, मंगला ठाकरे, जयश्री कोरे, वंदना नागोसे, कविता कामडे, अर्चना ठाकरे, यशोदा मेश्राम मीनाक्षी उईके यांनी केली आहे.

गुढरीवासियांची मदार बोअरवेलवर

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना तुमसर तालुक्यातील गुढरी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. गावातील नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांची पूर्ण मदार आता बोअरवेलवर आहे. गावात नळ योजनेतून पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना दररोज बोअरवेलवर रांगा लावून पाणी भरावे लागत आहे. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी दैनंदिन कामे अडचणीत येत असून जनावरांसाठीही पाण्याची टंचाई जाणवत आहे. वाढत्या उन्हामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. येथे पाच वर्षांपासून पाण्यासाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही.

"समस्या सुटावी यासाठी सरपंचांकडे तक्रार केली. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी महिलांची पाण्यासाठी पायपीट वाढली आहे."- अर्चना त्रिपाठी, ग्रामपंचायत सदस्य सानगाव

 

English
हिंदी सारांश
Web Title : Crores spent, yet water scarcity persists: Water supply schemes fail.

Web Summary : Despite crores spent on water schemes, villages in Bhandara face acute water shortage. Faulty tanks and defunct pipelines leave residents reliant on wells and borewells, causing hardship, especially for women and livestock.
टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणी कपातwater transportजलवाहतूकMaharashtraमहाराष्ट्र