शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चालक-वाहकांच्या मनमानीचा कळस

By admin | Updated: October 22, 2014 23:13 IST

बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सुट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करणे, वेळेची नियमितता न पाळणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.

भंडारा : बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे प्रवासी त्रस्त झाले असून, नियोजित थांब्यावर बस न थांबविणे, सुट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करणे, वेळेची नियमितता न पाळणे अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसत आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी असे राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीचे घोषवाक्य आहे. परंतु याच घोषवाक्याचा विसर एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला दिसत असून, बसचालक आणि वाहकांच्या मनमानीमुळे भंडारा, साकोली, पवनी तालुक्यातील प्रवासी त्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. भंडारा, साकोली, पवनी मार्गावर अनेक ठिकाणी बसस्थांबे आहेत. या ठिकाणी बस थांबविणे आवश्यक असताना बसचालक आणि वाहकही ती काळजी घेत नसल्याचे दिसते. बसचालकांच्या या मनमानीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो. वेळेवर बस न मिळाल्याने त्यांची विविध कामेही खोळंबतात. त्याशिवाय प्रवास भाड्यावरूनही बसवाहक प्रवाशांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. प्रवाशांकडे नेमके सुटे पैसे नसल्यास त्यांना वाहकांकडून उद्धटपणाची वागणूक देण्यात येत. तिकिटावर लिहून उर्वरित पैसे नंतर देण्याचे सांगण्यात येते. परंतु प्रवास संपल्यानंतर प्रवासी वाहकांकडे उर्वरित पैशांची मागणी करतात त्यावेळी उलट प्रवाशांच्या उर्वरित पैशांचे गणित जुळवून त्यांच्याकडे दहा रूपये, वीस रूपयांची नोट देवून त्याचे सुटे घेवून हिशोब चुकता करण्याचा सल्ला देण्यात येतो, त्याशिवाय अनेक वाहक आणि चालक वेळेचे भानही ठेवत असल्याचे दिसत नाही. उपहारगृह किंवा इतर ठिकाणी उभे राहून गप्पा ठोकत असल्याचे दिसतात. त्यामुळे प्रवाशांना ठरलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही. (नगर प्रतिनिधी)