शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निर्माणाधीन उड्डाणपूलावरुन क्रेन बकेट रेल्वे फाटकावर कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST

देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु आहे. रेल्वे फाटकाजवळ पुलाचे मोठे कॉलम भरण्याचे काम केले जात आहे. हायड्रा क्रेनद्वारे सिमेंट, गिट्टीने भरलेली बकेट वर पाठविली जाते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास हायड्रा क्रेन अचानक अनियंत्रित झाली व बकेटसह क्रेन थेट रेल्वे फाटकावर आदळली. त्यात क्रेनचा चालक थोडक्यात बचावला. तर रेल्वे फाटक बंद होते.

ठळक मुद्देतुमसर लगतची घटना। सुदैवाने दोन मोटारसायकलस्वार बचावले

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : निर्माणाधिन उड्डाणपूल बांधकामादरम्यान हायड्रा क्रेन अनियंत्रीत होवून लोखंडी बकेट रेल्वे फाटकावर कोसळण्याची घटना तुमसरलगत देव्हाडी येथे शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. नेमके याचवेळी दोन दुचाकीस्वार रेल्वेफाटक पार करीत होते. सुदैवाने ते दोघेही या अपघातातून बचावले. मात्र तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.
देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम सुरु आहे. रेल्वे फाटकाजवळ पुलाचे मोठे कॉलम भरण्याचे काम केले जात आहे. हायड्रा क्रेनद्वारे सिमेंट, गिट्टीने भरलेली बकेट वर पाठविली जाते. सकाळी ८ वाजताच्या सुमारास हायड्रा क्रेन अचानक अनियंत्रित झाली व बकेटसह क्रेन थेट रेल्वे फाटकावर आदळली. त्यात क्रेनचा चालक थोडक्यात बचावला. तर रेल्वे फाटक बंद होते. मात्र दोन दुचाकीस्वार तेथून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दुचाकीसह पळ काढला. त्यामुळे ते थोडक्यात बचावले.
हायड्रा मशीन कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. एकच धावपळ झाली. रेल्वे फाटकावर हायड्रा मशीनचा दांडा व बकेट कोसळल्याने रेल्वे फाटकाचे अक्षरश: दोन तुकडे झाले. निष्काळजीपणा व अपघाताला जबाबदार धरुन संबंधीत कंत्राटदारावर रेल्वे प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. हायड्रा मशीनही जप्त करण्यात आली आहे.
रेल्वे उड्डाणपूलाचा कॉलम भरावादरम्यान हा अपघात घडला. अपघात स्थळापासून अवघ्या दोन फुटावर ओव्हरहेड वीज तारा आहे. उच्चदाब वीज तारांना स्पर्श झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. येथे सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्ष होत असून सुमारे २५ कोटी रुपयांचे बांधकाम सुरु असतांना पुरेशा सुरक्षा उपाययोजना होताना दिसत नाही. या बांधकामाजवळून राष्ट्रीय महामार्ग २४ तास सुरु असतो. येथे चार ते पाच तांत्रिक कर्मचारी काम करतांना दिसतात.

टॅग्स :railwayरेल्वे