शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. तुमसर तालुक्यात ४५.२ मिमी, लाखांदूर ४४.५ मिमी, लाखनी ४२.८ मिमी, मोहाडी ३८.३ मिमी आणि भंडारा तालुक्यात २१.१ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देतलाव तुडुंब, नदी-नाल्यांना पूर : गत २४ तासात ४३.४ मिमी पावसाची नोंद, जनजीवन विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून शुक्रवारीही क्षणभराची उसंत न घेता पाऊस बरसत होता. या पावसाने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून तलाव तुडुंब भरले आहे. आठ दिवसापुर्वी गुरूवारीच जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली होती. आता पुन्हा संततधार पाऊस बरसत असल्याने धान पीक धोक्यात आले आहे.जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. तुमसर तालुक्यात ४५.२ मिमी, लाखांदूर ४४.५ मिमी, लाखनी ४२.८ मिमी, मोहाडी ३८.३ मिमी आणि भंडारा तालुक्यात २१.१ मिमी पावसाची नोंद झाली. १ जून ते २८ आॅगस्ट या कालावधीत जिल्ह्यात १०२४.८ मिमी पावसाची नोंद झाली असून प्रत्यक्ष पडणाऱ्या सरासरी पावसाच्या १०१ टक्के आहे.साकोली येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात गत ४८ तासापासून पाऊस सुरू आहे. या पावसाने तालुक्यातील तलाव, बोड्या तुडुंब झाल्या आहेत. साकोली येथील दोन तलाव भरले असून एकोडी मार्गावरील तलावही पूर्ण भरला आहे. गत ४८ तासापासून पाऊस सुरू असल्याने या तलावाची पाळ कमजोर झाली आहे. नगरसेवक मनिष कापगते यांनी प्रशासनाशी संपर्क साधला. उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तेढे, मुख्याधिकारी माधुरी मडावी, पोलीस निरीक्षक मनोज सिडाम यांनी तलावावर जावून पाहणी केली. तेथे मलबा टाकण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात या पावसाने कुठेही नुकसानीची माहिती नाही.तुमसर तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासापासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गर्रा बघेडा परिसरात १०३ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याने नाले दुथडी भरून वाहत आहे. शुक्रवारी तहसील कार्यालयात मंडळ अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. लाखनी तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील मानेगाव येथील बोडी ओव्हरफ्लो झाल्याने पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. संततधार पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहन आहे. तालुक्यातील पालांदूर परिसरात शुक्रवारी दिवसभर पावसाने हजेरी लावून चुलबंद खोºयातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. पालांदूर येथे ५१.४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली. शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपडत असून संततधार पावसाने चांगलाच धास्तावला आहे. लाखांदूर तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर