शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
2
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
3
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
4
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
5
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
6
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
7
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
8
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
9
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
10
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
11
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
12
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
13
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
14
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
15
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
16
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
17
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
18
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
19
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
20
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
Daily Top 2Weekly Top 5

Hanuman Jayanti 2026: गदाधारी मारुती झोपलेल्या अवस्थेत? वाचा प्रयागराजच्या 'या' अनोख्या मंदिराचे अजब वास्तव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 10:44 IST

Hanuman Jayanti 2026: नेहमी सेवेस तत्पर असणारे हनुमंत चक्क विश्रांती घेतात? हनुमान जयंतीनिमित्त जाणून घ्या प्रयागराजमधील 'लेटे हनुमान' मंदिराचे अद्भूत रहस्य!

हनुमान, बजरंगबली, मारुती या नावांना जोडून एक प्रतिमा डोळ्यासमोर येते, ती म्हणजे आकाशात उड्डाण करणारे, श्रीरामाच्या सेवेत रत असणारे, संकटात धावून जाणारे मारुती! त्यांच्या मंदिरातही त्यांची गदाधारी मूर्तीच नजरेस पडते. असे असतानाही एक मंदिर असे आहे जिथे हनुमान चक्क विश्रांती घेत आहेत. एवढेच नाही, तर लोकांची श्रद्धा आहे की त्या स्थितीतही ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमान जयंतीनिमित्त(Hanuman Jayanti 2026) जाणून घेऊया त्या मंदिराबद्दल सविस्तर माहिती. 

Hanuman Jayanti 2026: हनुमंताला १ पुत्र होता आणि ५ भाऊ; काय होती त्यांची नावे? वाचा रंजक आणि अज्ञात पैलू!

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रयागराजमध्ये हनुमानाची भारतातील एकमेव अशी मूर्ती आहे जी निद्रिस्त (झोपलेल्या) मुद्रेत आहे. म्हणूनच त्यांना 'लेटे हनुमान(Sleeping Hanuman Temple at Prayagraj) या नावानेही ओळखले जाते. या मूर्तीला पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक येतात. असे मानले जाते की ही मूर्ती अनेक शतकांपासून येथे आहे. ही मूर्ती नेमकी कधी आणि कशी आली, हे निश्चितपणे सांगता येत नाही, पण तिच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत.

या मंदिराशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी:

असे मानले जाते की, रावणाशी झालेल्या युद्धानंतर हनुमान अत्यंत थकून गेले होते आणि त्यांची मूर्ती त्याच अवस्थेचे प्रतीक आहे. अन्यथा हनुमंत झोपलेल्या अवस्थेत असलेली मूर्ती सापडणे दुर्मिळच आहे. 

गंगाही घेते दर्शन :

असे म्हटले जाते, की गंगा माता शिवशंकराला म्हणाली, मी सगळ्यांचे पाप धुते, मला पावन होण्यासाठी रुद्र अवतार असलेल्या हनुमंताच्या सेवेची संधी कधी देणार? त्यावेळी महादेवांनी गंगेला ती संधी दिली आणि हनुमंत जेव्हा प्रयागराजच्या काठावर येऊन पहुडले, तेव्हा दरवर्षी स्वतः गंगा माई पावसाळ्यात पूर आला असता हनुमंताच्या भेटीला थेट मंदिरापर्यंत पोहोचते. 

Hanuman Jayanti 2026: हनुमान आणि शनी मंदिर नेहमी शेजारीच का असते? जाणून घ्या यामागील 'हे' गुपित!

ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व : 

हे मंदिर प्रयागराज येथील किल्ला आणि संगमच्या जवळ आहे, त्यामुळे या स्थळाला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे येथे दर्शनासाठी नेहमीच मोठी गर्दी असते. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते श्रद्धा आणि इतिहासाचे प्रतीक आहे. हनुमंताच्या या अनोख्या मूर्तीमुळे या मंदिराला एक वेगळी ओळख मिळाली आहे. 

चैत्र पौर्णिमा २०२६: हिंदू नववर्षाची पहिली पौर्णिमा; १० सेकंदात मिळवा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं पुण्य!

English
हिंदी सारांश
Web Title : Prayagraj's unique Hanuman temple: Sleeping deity fulfills devotees' wishes.

Web Summary : Prayagraj has a unique sleeping Hanuman statue. Devotees believe resting Hanuman blesses and fulfills wishes. The temple near Sangam holds historical, religious significance, drawing crowds globally. Legend says Ganga herself visits Hanuman.
टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीTempleमंदिरPrayagrajप्रयागराजIndian Festivalsभारतीय उत्सव-सण