आचार्य चाणक्य यांनी त्या काळात सांगितलेले नियम आजही तितकेच लागू पडतात, जितके ते प्राचीन काळात होते. आचार्य सांगतात, माणसं ओळखणं ही कला आहे. ती वेळीच आत्मसात करा. अन्यथा ज्यांना आपले समजता तेच शत्रू होऊन कधी तुमच्या विरुद्ध उभे राहतील, सांगता येणार नाही.
हे ही वाचा : स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
मैत्री आणि विश्वास या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पण कधीकधी याच नात्यांमध्ये आपली सर्वात मोठी फसवणूक होते. आचार्य चाणक्य म्हणतात की, शत्रूने केलेली फसवणूक आपल्याला सावध करते, पण जवळच्या मित्राने किंवा विश्वासू व्यक्तीने दिलेला धोका आपल्याला उद्ध्वस्त करू शकतो. तसे होऊ नये म्हणून वाचा पुढील नियम.
१. तुमची गुपिते कधीही पूर्णपणे सांगू नका (Never Reveal Your Secrets)
सर्वात महत्त्वाचा नियम आहे— "आपल्या मनातील गुपिते कधीही कोणालाही सांगू नका, मग तो तुमचा कितीही जवळचा मित्र का असेना."कारण परिस्थिती बदलली की तोच मित्र शत्रू बनू शकतो. जेव्हा तुम्ही तुमचे गुपित दुसऱ्याला सांगता, तेव्हा तुम्ही स्वत त्याच्या समोर 'शरण' जाता. तुमच्या कमकुवत दुव्यांची माहिती समोरच्याला असणे, हीच तुमच्या फसवणुकीची पहिली पायरी असते.
२. अति-गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा (Beware of Flatterers)
ज्या व्यक्ती तुमच्या समोर अतिशय गोड बोलतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीला 'हो' मध्ये 'हो' मिळवतात, अशा लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. चाणक्य म्हणतात, "ज्या पात्रात वर दूध आहे पण खाली विष भरलेले आहे, अशा पात्राचा त्याग करणेच श्रेयस्कर आहे." जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करतात आणि समोर स्तुती करतात, ते संधी मिळताच तुमची फसवणूक करू शकतात.
३. विश्वासाला 'सीमा' असू द्या (Set Limits to Trust)
विश्वास ठेवा, पण तो आंधळा नसावा. एखाद्यावर इतकाही विश्वास टाकू नका की, त्याच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. चाणक्य सांगतात की, जेव्हा विश्वास मर्यादेबाहेर जातो, तेव्हा माणूस गाफील राहतो आणि हीच गाफील वृत्ती शत्रूला किंवा कपटी मित्राला संधी देते.
हे ही वाचा : Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
४. संकटाच्या वेळी खरी मैत्री ओळखा (Test Friendship in Adversity)
खरा मित्र तोच जो तुमच्या कठीण काळात, आजारपणात, दुष्काळात आणि स्मशानात (शेवटच्या प्रवासात) तुमच्या सोबत उभा असतो. जर एखादी व्यक्ती केवळ तुमच्या सुखात आणि संपत्तीत सहभागी असेल, तर समजून जा की तो 'संधीसाधू' आहे. अशा लोकांशी मैत्री असणे ही फसवणुकीला निमंत्रण देण्यासारखे आहे.
५. तुमची कमजोरी सापासारखी लपवून ठेवा (Hide Your Weakness)
जर एखादा साप विषारी नसेल, तरी त्याने स्वतःला विषारी असल्याचेच भासवले पाहिजे. त्याचप्रमाणे, तुमचे शत्रू किंवा तुमचे स्पर्धक मित्र तुमच्या कमजोरीचा शोध घेत असतात. कधीही स्वतःच्या मर्यादा किंवा कमतरता उघड करू नका. जोपर्यंत समोरच्याला तुमच्या ताकदीचा अंदाज येत नाही, तोपर्यंत तुमची फसवणूक करण्याची त्याची हिंमत होणार नाही.
Web Summary : Chanakya Niti warns that friends can betray you. Don't reveal secrets, beware of flatterers, and set limits to trust. True friends stand by you in adversity. Conceal your weaknesses to prevent exploitation and deceit.
Web Summary : चाणक्य नीति चेतावनी देती है कि दोस्त धोखा दे सकते हैं। रहस्य न बताएं, चापलूसों से सावधान रहें और विश्वास की सीमाएं निर्धारित करें। सच्चे मित्र विपत्ति में साथ देते हैं। शोषण और धोखे से बचने के लिए अपनी कमजोरियों को छिपाएं।